जाहिरात
मराठी बातम्या / Viral / दारुड्याची शोले स्टाईल विरुगिरी; बायकोला सासरी बोलवण्यासाठी मोबाईल टॉवरवर चढला अन्.., जालन्यातील VIDEO

दारुड्याची शोले स्टाईल विरुगिरी; बायकोला सासरी बोलवण्यासाठी मोबाईल टॉवरवर चढला अन्.., जालन्यातील VIDEO

दारुड्याची शोले स्टाईल विरुगिरी; बायकोला सासरी बोलवण्यासाठी मोबाईल टॉवरवर चढला अन्.., जालन्यातील VIDEO

माहेरी गेलेली बायको सासरी परत नांदायला येत नसल्याने दारूड्याने थेट मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल विरुगिरी केली (Man Climbs Mobile Tower). बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे हा प्रकार घडला

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

जालना 21 जुलै : सध्या राज्यात सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आल्याच्या घटना घडताना दिसत आहे. याबद्दलचं वृत्तही सातत्याने समोर येत आहेत. यादरम्यान जालन्यातून मात्र आता एक अजब घटना समोर आली आहे. या घटनेत माहेरी गेलेल्या पत्नीला पुन्हा सासरी नांदायला बोलवण्यासाठी एका व्यक्तीने भलताच घाट घातला. Jalgaon Bogus Doctor : जळगाव जिह्यात मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट, अधिकारी येताच पळाले माहेरी गेलेली बायको सासरी परत नांदायला येत नसल्याने दारूड्याने थेट मोबाईल टॉवरवर चढून शोले स्टाईल विरुगिरी केली (Man Climbs Mobile Tower). बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे हा प्रकार घडला.

जाहिरात

सदर घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दारूड्याला खाली येण्याची विनंती केली. मात्र, तो खाली उतरण्यास तयार नव्हता, त्यामुळे अखेर अग्निशमन दलाला पाचारण करून त्याला खाली उतरविण्यात आलं. VIDEO: एका बिअर बॉटलसाठी चोरट्याने फोडलं वाईन शॉप; बुलडाण्यातील अजब चोरीची घटना CCTV मध्ये कैद “अरे खाली ये तुला आमदार करतो” दरम्यान, सदर दारूड्याला टॉवरवरून खाली उतरविण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थांकडून प्रयत्न सुरू होते. सगळे आपल्या परीने त्याला खाली येण्याचं आवाहन करत होते. यावेळी एका ग्रामस्थाने तर “अरे खाली ये तुला आमदार करतो” असं आमिष दाखवत उपरोधिक आवाहन केलं. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात