जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / VIDEO: एका बिअर बॉटलसाठी चोरट्याने फोडलं वाईन शॉप; बुलडाण्यातील अजब चोरीची घटना CCTV मध्ये कैद

VIDEO: एका बिअर बॉटलसाठी चोरट्याने फोडलं वाईन शॉप; बुलडाण्यातील अजब चोरीची घटना CCTV मध्ये कैद

VIDEO: एका बिअर बॉटलसाठी चोरट्याने फोडलं वाईन शॉप; बुलडाण्यातील अजब चोरीची घटना CCTV मध्ये कैद

या ‘प्रामाणिक’ चोरट्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे (Theft Incident Captured in CCTV) .

  • -MIN READ Buldana,Maharashtra
  • Last Updated :

राहुल खंदारे, प्रतिनिधी  बुलडाणा 21 जुलै : जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून चोरीचं सत्र कायम असून आता तर चोरट्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. बुलडाणा शहरात एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरी झाली आहे. मात्र, या चार चोऱ्यांपैकी एक चोरी चांगलीच चर्चेत आहे. यात वाईन बारमध्ये घुसून चोरट्याने केवळ एक बियरची बाटली चोरली आहे (Thief Stolen 1 Beer Bottle from Beer Bar). या ‘प्रामाणिक’ चोरट्याची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे (Theft Incident Captured in CCTV) . घरात घुसून बेदम मारहाण करून तरुणाचा घेतला जीव, बीड हादरलं बुलडाणा शहरातील माँ भगवती कॉम्प्लेक्समधील नवरंग जनरल स्टोअर्स, शंकर बूक डेपो, लाठे किराणा ही दुकाने रात्री 2 वाजताच्या सुमारास फोडण्यात आली आहेत.

जाहिरात

या तीन दुकानांमधून शटर वाकवून रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. त्यानंतर या चोरट्यांनी आपला मोर्चा संगम चौकातील ऋचा वाइन शॉपवर साडेपाच वाजताच्या दरम्यान वळवला. मात्र, यानंतर जे काही घडलं, ते आश्चर्यचकित करणारं होतं. Wedding Fight : एकाच महिलेसोबत डान्स करण्यासाठी लग्नात 2 पुरुषांचा राडा; शेवटी काय झालं पाहा VIDEO चोरट्यांनी या शॉपचे शटर वाकवून आतमध्ये प्रवेश केला. मात्र, इतकं कष्ट घेऊन चोराने फक्त एकच बिअरची बाटली चोरली. चक्क एक बिअरची बॉटल चोरून चोरटा फरार झाला आहे. ही चोरी सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. पोलीस सध्या या चोरट्याचा शोध घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात