नवी दिल्ली 12 जून : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही अतिशय धक्कादायक असतात, तर काही तुम्हाला पोट धरून हसायला भाग पाडणारे असतात. दरम्यान, सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून लोकांना हसू आवरत नाहीये. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विजेच्या खांबावर आरामात झोपलेला दिसत आहे. आता ही क्लिप पाहून कोणी याला देसी दारूचा चमत्कार म्हणत आहे, तर कोणी तो इथे नेमका कसा चढला, हे विचारत आहे. हाईटच झाली राव! इतकी दारू प्यायला की नशेत हरवला आणि पोलिसांना घेऊन स्वतःलाच शोधायला निघाला तुम्ही अनेकदा लोकांना असं म्हणताना ऐकलं असेल की ते दारूच्या नशेत तो भलताच हवेत उडत आहे. आता नशेत लोक कसे उडतात, हे तुम्हाला दिसेल. व्हायरल क्लिपच्या सुरुवातीला चौकात लोकांची मोठी गर्दी दिसत आहे. प्रत्येकजण वरच्या दिशेनं पाहत आहे. पुढच्याच क्षणी जेव्हा कॅमेऱ्याचा अँगल बदलतो तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या लाईटच्या खांबावर एक व्यक्ती पडलेली दिसते. तुमच्याप्रमाणेच तिथे उपस्थित असलेला जमावही विचार करत आहे, की हा माणूस वर कसा चढला आणि तिथे काय करतोय.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @zore_amol_ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. युजरने पॉवर ऑफ देसी असं कॅप्शन दिलं आहे. 5 जून रोजी अपलोड केलेला हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत सुमारे 67 हजार लोकांनी याला लाईक केलं आहे, तर अनेक यूजर्सनी कमेंट सेक्शनमध्ये मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने आश्चर्यचकित होऊन विचारलं आहे की, आधी तो माणूस खांबावर कसा चढला ते सांगा. त्याच वेळी, दुसर्या वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, तो मद्यपान केल्यानंतर खरोखरच उडाला. आणखी एका यूजरने लिहिलं, ये है हस्ती का बस्ती ब्रो. याशिवाय, बहुतेक वापरकर्त्यांनी कमेंटमध्ये इमोजी पोस्ट केल्या आहेत .