मराठी बातम्या /बातम्या /विदेश /हाईटच झाली राव! इतकी दारू प्यायला की नशेत हरवला आणि पोलिसांना घेऊन स्वतःलाच शोधायला निघाला

हाईटच झाली राव! इतकी दारू प्यायला की नशेत हरवला आणि पोलिसांना घेऊन स्वतःलाच शोधायला निघाला

बेपत्ता व्यक्ती सापडताच पोलीसही चक्रावले.

बेपत्ता व्यक्ती सापडताच पोलीसही चक्रावले.

बेपत्ता व्यक्ती सापडताच पोलीसही चक्रावले.

अंकारा, 30 सप्टेंबर : दारू प्यायल्यानंतर (Daaru) नशा चढते आणि बहुतेक वेळा नशेत (Drinking daaru) ती व्यक्ती काय करते हे तिलाही माहिती नसतं. कुणी नशेत खरं बोलतं (Drinking beer), कुणी वेगळ्यात भाषेत बोलू लागतं, कुणी मोठमोठ्याने बोलतं, कुणी डान्स करतं किंवा कुणी आणखी काहीतरी वेगळं करतं (Alcohol). पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक व्यक्ती नशेत (Drinking Alcohol) इतकी हरवली की पोलिसांसोबत स्वतःलाच शोधायला निघाली (Drunk man search himself with police).

तुर्कस्तानच्या (Turkey) इनगोल शहरातील ही घटना. जिथं एक व्यक्ती पोलिसांसोबत स्वतःलाच शोधत होती. ज्या व्यक्तीला आपण शोधत आहोत ती व्यक्ती आपल्यासोबतच आहे हे पोलिसांनाही माहिती नव्हतं आणि आपण पोलिसांसोबत ज्या व्यक्तीला शोधत आहोत ती आपणच आहोत याची कल्पनाही त्या व्यक्तीलाही नव्हती.

हे वाचा - OMG! शीर धडावेगळं झालं तरी टुणटुण उड्या मारतं; बेडकाचा आश्चर्यकारक VIDEO VIRAL

बेहान मुटलू (Beyhan Mutlu) नावाची ही व्यक्ती  आपल्या मित्रांसोबत दारू प्यायला गेली. बेहान इतकी दारू प्यायला होता की नशेत तो जंगलात भरकटला. त्याच्याशी काहीचं संपर्क होत नसल्याने, त्याचा पत्ता लागत नसल्याने अखेर तो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या जवळच्या व्यक्तींनी पोलिसात नोंदवली. त्यानंतर पोलीस बेहाला शोधायला निघाले.

बेहानला शोधता शोधात पोलीस जंगलापर्यंत पोहोचले. तिथं त्यांना काही लोक सापडले. पोलिसांनी त्यांचीही चौकशी केली त्यानंतर हे लोकसुद्धा पोलिसांसोबत बेपत्ता बेहानला शोधायला निघाले. थोड्या वेळाने पोलीस बेहानच्या नावाने ओरडू लागले. जेणेकरून तो जिथं कुठे असेल तिथून आवाज ऐकून येईल. बेहान नाव ऐकून पोलिसांसोबत बेपत्ता व्यक्तीला शोधायला निघालेल्या लोकांमधूनच मी इथं आहे, असा आवाज आला. सर्वांना धक्काच बसला.

हे वाचा - ना बैल, ना ट्रॅक्टर, पठ्ठ्याने बाईकनेच नांगरलं शेत; कसं ते पाहा VIDEO

जी लोकं पोलिसांसोबत बेपत्ता व्यक्तीला शोधत होती त्याच लोकांमध्ये बेहानही होता. पोलिसांना याची माहिती नव्हती कारण त्यांच्याकडे बेहानचा फोटो नव्हता आणि हे लोक आपल्याला शोधत आहेत, हे बेहानलाही माहिती नव्हतं. इतक्या वेळापासून इतक्या ठिकाणी आपण ज्या बेपत्ता व्यक्तीला शोधत होतो, ती व्यक्ती कित्येक वेळापासून आपल्यासोबतच होती, हे समजताच पोलीसही चक्रावले.

First published:

Tags: Drunk boy, Turkey, World news