जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: भरधाव वेगात रस्त्यावर धावत होती कार अन् चालकाला लागली झोप; थक्क करणारी घटना कॅमेऱ्यात कैद

VIDEO: भरधाव वेगात रस्त्यावर धावत होती कार अन् चालकाला लागली झोप; थक्क करणारी घटना कॅमेऱ्यात कैद

VIDEO: भरधाव वेगात रस्त्यावर धावत होती कार अन् चालकाला लागली झोप; थक्क करणारी घटना कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. व्हिडिओमध्ये एका रस्त्यावर एक कार भरधाव वेगाने जात आहे, विशेष बाब म्हणजे कारचा ड्रायव्हर आतमध्ये झोपलेला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 एप्रिल : तुम्ही अनेकदा ऐकलं असेल आणि पाहिलंही असेल की लोक गाडी चालवताना डुलकी घेण्यास सुरुवात करतात. झोपेमुळे डोळे जड होतात आणि अनेकदा अशा परिस्थिती झोप लागल्यास मोठे अपघातही होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत वाहनचालकांना चांगली झोप झाल्यावरच गाडी चालवण्याचा सल्ला दिला जातो. मात्र आजकाल एक व्हिडिओ चर्चेत आहे. ज्यामध्ये चालक आणि त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती चालत्या गाडीत झोपलेली दिसत आहे (Driver sleeping in moving car) आणि तरीही वाहनाचा अपघात होत नाही. गाडी आपोआप व्यवस्थित चालत राहाते. Monkey चा Video पाहून भडकले नेटिझन्स; असं यात आहे तरी काय पाहा आगळ्यावेगळ्या व्हिडिओंसाठी प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Unilad वर अनेक मजेदार व्हिडिओ शेअर केले जातात. यातील अनेक व्हिडिओ थक्क करणारे असतात. नुकताच असाच एक व्हिडिओ (Viral Video) या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. व्हिडिओमध्ये एका रस्त्यावर एक कार भरधाव वेगाने जात आहे, विशेष बाब म्हणजे कारचा ड्रायव्हर आतमध्ये झोपलेला आहे.

जाहिरात

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की - हे खूपच धोकादायक दिसत आहे, तरीही मला हेवा वाटतो. व्हिडिओमध्ये एक पांढऱ्या रंगाची कार दिसत आहे जी खूप वेगाने जात आहे. व्हिडिओ शूट करणारी व्यक्ती जेव्हा आपल्या कारमधून गाडीच्या शेजारी येते तेव्हा गाडीचा ड्रायव्हर आणि त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती दोघेही झोपलेले दिसतात. त्यांचं डोकं खालच्या दिशेनं झुकत आहे. असं असूनही, कोणतीही अडचण न येता कार सुरळीत चालत आहे. खरं तर, ही सामान्य कार नाही, ती टेस्ला कंपनीची ऑटोमॅटिक कार आहे (Self driving Tesla car). या गाड्यांमध्ये ऑटो ड्राइव्ह मोड ऑन केल्यानंतर ड्रायव्हर आरामात झोपू शकतो आणि या गाड्या संगणकाच्या माध्यमातून आपोआप धावत राहतात. OMG! ‘सुपर से भी ऊपर’ आजीबाई; वयाच्या 99 व्या वर्षी इंजिनशिवाय उडवलं Plane; पाहा जबरदस्त Video या व्हिडिओला 1 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत तर 7 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. व्हिडिओ पाहणारे बहुतेक लोक अशा ड्रायव्हरची खिल्ली उडवत आहेत जे सेल्फ ड्राईव्ह कारमध्ये ऑटो ड्राईव्ह मोडवर गाडी सेट करून झोपतात. लोकांचं म्हणणं आहे की हे खूप धोकादायक असू शकतं. कारण कार शेवटी संगणकानुसार चालते, अशा परिस्थितीत अपघात होऊ शकतो. एका व्यक्तीने लिहिलं की नंतर त्याची देवासोबत भेट झाली असेल. आणखी एकाने लिहिलं की, तो कारवर कधीही विश्वास ठेवणार नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात