मुंबई, 25 एप्रिल : प्राण्यांचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकी एक म्हणजे माकड (Monkey video). माकडाचे बहुतेक व्हिडीओ हे मजेशीर असतात. पण सध्या असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून नेटिझन्स संतप्त झाले आहेत. मजेशीर म्हणून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पण यात हसण्यासारखं काही नाही, उलट हे संतापजनक कृत्य आहे, अशी प्रतिक्रिया नेटिझन्सनी दिली आहे. आता असं या व्हिडीओत आहे तरी काय पाहुया. एका प्राणीसंग्रहालयातील हा व्हिडीओ असावा असं दिसतं आहे. एका ठिकाणी माकडाला ठेवण्यात आलं आहे. बाजूने जाळी लावण्यात आली आहे. माकडाच्या तोंडात प्लॅस्टिक किंवा कापडासारखी एक वस्तू आहे. पिंजऱ्याबाहेर माकडासमोर एक व्यक्ती उभी आहे. ती व्यक्ती माकडाच्या तोंडातील वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करते. हे वाचा - खतरनाक मगरीला मांडीवर घेऊन खेळवताना दिसला व्यक्ती; VIDEO बघूनच फुटेल घाम माकड त्या व्यक्तीला प्रतिकार करतं. पण ती व्यक्ती ती वस्तू हिसकावते. माकडही शॉक होतं. ते त्या व्यक्तीकडे काही वेळ पाहत राहतं. त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा त्या माकडाकडे आपला हात नेत ती वस्तू देण्याचा प्रयत्न करते. माकडही हार मानत नाही. ते पुन्हा त्या माणसाकडून ती वस्तू परत मिळवतं.
तसं पाहायला गेलं तर हा व्हिडीओ तुम्हाला सामान्य वाटेल. माणूस माकडाशी खेळत आहे, असं वाटेल. पण असं करणं म्हणजे प्राण्यांना एकप्रकारे त्यांना त्रास देणं, त्यांचा छळ करणं आहे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. माकडाला त्रास देणं बंद करा, तुमच्यासाठी ही मस्ती असेल पण माकडासाठी नाही, हा व्हिडीओ मला कोणत्याच अँगलने फनी वाटत नाही, अशा कमेंट युझर्सनी केल्या आहेत.