जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO: अचानक नदीचं पाणी वाढलं आणि पुरात अडकला कार चालक; पुढे जे घडलं ते हादरवून सोडणारं

VIDEO: अचानक नदीचं पाणी वाढलं आणि पुरात अडकला कार चालक; पुढे जे घडलं ते हादरवून सोडणारं

VIDEO: अचानक नदीचं पाणी वाढलं आणि पुरात अडकला कार चालक; पुढे जे घडलं ते हादरवून सोडणारं

व्हिडिओमध्ये (Viral Video on Social Media) दिसतं की नदीच्या प्रवाहात एक कार अडकली होती, पण चालकाने समजूतदारपणाने आणि सावधगिरीने स्वतःला अडचणीतून बाहेर काढलं

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 01 मे : प्रवास करणं आणि फिरणं जवळपास सगळ्यांनाच आवडतं. काहींना डोंगरात फिरायला आवडतं तर काहींना नदीच्या काठावर फिरायला आवडतं. मात्र, अनेकवेळा असं घडतं की, फिरण्याच्या नादात लोक मोठ्या संकटातही अडकतात. सहसा ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असतो, तिथे अशा घटना जास्त प्रमाणात घडतात. लोक फिरण्याच्या उद्देशाने नदीच्या काठावर जातात आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यावर ते तिथेच अडकतात. अशा परिस्थितीत एनडीआरएफ टीम किंवा लष्कराला मदतीसाठी पाचारण करावं लागतं. अनेकदा अशा घटनांशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही थक्क व्हाल (Car Stuck in Flow of River).   झाडाला उलटं लटकवून तरुणाला काठीने जबर मारहाण; घटनेचा संतापजनक VIDEO व्हिडिओमध्ये (Viral Video on Social Media) दिसतं की नदीच्या प्रवाहात एक कार अडकली होती, पण चालकाने समजूतदारपणाने आणि सावधगिरीने स्वतःला अडचणीतून बाहेर काढलं. ड्रायव्हरला खात्री होती की तो या संकटातून बाहेर पडेल. म्हणूनच असं म्हणतात की माणसानं स्वतःवर विश्वास ठेवून ध्येयाकडे वाटचाल करत राहावी. शेवटी यश मिळतंच. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नदीचा प्रवाह वेगाने वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला एक कार प्रवाहासोबत वेगाने वाहत आहे.

जाहिरात

नदीचं पाणी आणखी वाढण्याआधी कार चालकाला सुरक्षित ठिकाणी पोहोचायचं असतं. दुसरीकडे नदीचं पाणीही अगदी वेगात पुढे जात असतं. मात्र यादरम्यान कार चालकाने दाखवलेल्या धाडसाचं कौतुक करावं लागेल. सहसा अशा परिस्थितीत लोक अगोदरच हार मानतात, मात्र कार चालकाने शेवटपर्यंत हार न मानता स्वतःला नदीतून सुखरूप बाहेर काढलं. रेस्टॉरंटमध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंडला केलं लग्नासाठी प्रपोज, पण नको ते घडलं, VIDEO हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘ज्याला स्वतःवर विश्वास आहे, तो प्रत्येक अडचणीतून बाहेर पडू शकतो’. अवघ्या 26 सेकंदांच्या या व्हिडिओला आतापर्यंत 77 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर 5 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केलं आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात