जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Interesting Facts : दारु पिताना चिअर्स का म्हणतात? असं करण्यामागचं रंजक कारण समोर

Interesting Facts : दारु पिताना चिअर्स का म्हणतात? असं करण्यामागचं रंजक कारण समोर

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

कोणताही कार्यक्रम किंवा पार्टी असं चिअर्स केल्याशिवाय सुरु होत नाही. पण असं का केलं जातं, हे तुम्हाला माहितीय का?

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 जून : जगभरात इतक्या परंपरा आणि विधी आहेत. ज्याबद्दल आपल्याला माहिती देखील नाही. शिवाय आपण काही अशा गोष्टी वर्षांनूवर्षे करत असतो, ते आपण का करतो? यामागचं कारण ठावूक नसेल. त्यांपैकी एक म्हणजे चिअर्स. आपल्यापैकी अनेक लोक अल्कोहोलिक असतील. त्यांनी अनेकदा दारु पिताना समोरच्या व्यक्तीसोबत चिअर्स केलं असेल. यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या ग्लासाला आपला ग्लास चिकटवून चिअर्स केलं जातं आणि मग दारु प्यायली जाते. कोणताही कार्यक्रम किंवा पार्टी असं चिअर्स केल्याशिवाय सुरु होत नाही. पण असं का केलं जातं, हे तुम्हाला माहितीय का? दारु जितकी जुनी तितकी चांगली, मग बिअरची एक्सपायरी डेट का असते? ‘चीअर्स’ केल्याशिवाय, दारू ओठांना लावणे हे फोनवर संभाषण सुरू करण्यापूर्वी हॅलो न बोलण्याइतके अपूर्ण आहे. दारुचा ग्लास एकमेकांना मारण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे, पण याला असे का म्हणतात माहीत आहे का? आज आम्ही तुम्हाला सांगू की हा शब्द कसा उद्भवला, तो कुठून आला आणि असं का केलं जातं. ‘चिअर्स’ हा शब्द कुठून आला? चियर्स हा शब्द ‘चीअरे’ वरून आला आहे. हा फ्रेंच शब्द आहे. याचा अर्थ ‘चेहरा किंवा डोके’ असा होतो. जुन्या काळात चिअर्स बोलणे हे उत्सुकतेचे आणि प्रोत्साहनाचे प्रतीक होते. चिअर्स हा तुमचा आनंद व्यक्त करण्याचा आणि साजरा करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. याचा अर्थ आता चांगला काळ सुरू झाला आहे. Whisky आणि Whiskey मध्ये फरक काय? या दोन्ही दारु वेगळ्या असतात? दारू पिण्याआधी आपण चिअर्स का म्हणतो? 18व्या शतकात आनंद व्यक्त करण्यासाठी चिअर्स हा शब्द वापरला जात होता. कालांतराने हा शब्द उत्साह व्यक्त करण्यासाठी वापरला जाऊ लागला. म्हणूनच लोक उत्साहात चीअर्स वापरतात. काही रिपोर्ट्समध्ये वेगवेगळ्या गोष्टीही सांगण्यात आल्या आहेत. जर्मन रीतिरिवाजांमध्ये असे म्हटले जाते की ग्लास आदळला तर एव्हील किंवा भूत दारुपासून दूर राहते, म्हणून लोक मद्यपान करण्यापूर्वी एव्हील दूर ठेवण्यासाठी चिअर्स शब्द वापरतात आणि ग्लास एकमेकांना आदळतात. आपल्या सर्वांना पाच ज्ञानेंद्रिये आहेत हे माहित आहे. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा जे आपापल्या परीने काम करतात. दारू पिताना आपल्या चार इंद्रियांचे काम चालते जसे की, पेय डोळ्यांनी पाहणे, पिताना त्याची चव जिभेने अनुभवणे, नाकाने पेयाचा सुगंध अनुभवणे. पिण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत फक्त एकच इंद्रिय वापरला जात नाही आणि तो म्हणजे कान. ही उणीव पूर्ण करण्यासाठी त्याला चीअर्स म्हणतात आणि कानांच्या आनंदासाठी ग्लास एकमेकांवर मारला जातो ज्याचा ध्वनी तयार होतो. असे मानले जाते की अशा प्रकारे मद्यपान केल्याने पाच इंद्रियांचा उपयोग होतो आणि दारू पिण्याची अनुभूती अधिक आनंददायी होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात