भोपाळ, 16 मार्च : होळी (Happy Holi 2022) असा सण आहे, जो देशभऱ साजरा केला जातो. परदेशातही काही लोक हा सण उत्साहात साजरा करतात (Holi celebration). देशभरात होळीच्या बऱ्याच प्रथा, परंपरा आहे (Holi tradition). वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने होळी साजरी केली जाते. काही ठिकाणी तर इतक्या विचित्र परंपरा असतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. ज्या फक्त ऐकूनच आपल्याला आश्चर्य वाटतं. अशीच एक परंपरा म्हणजे तरुण-तरुणींनी एकमेकांना रंग लावताच ते लग्नाच्या बेडीत अडकतात.
होळी म्हणजे रंगाचा उत्सव. एकमेकांना रंग लावूनच हा सण साजरा केला जातो. पण एक असं गाव आहे, जिथं तरुण-तरुणींनी एकमेकांना रंग लावणं म्हणजे ते त्या दोघांचं लग्न मानलं जातं. इथं होळीदिवशी तरुण तरुणीला सर्वांसमोर पळवून नेतो आणि त्यावेळी कुटुंब काहीच करू शकत नाही. मध्य प्रदेशच्या एका गावातील भील आदिवासींची होळीची ही एक परंपरा आहे.
हे वाचा - Holi 2022: होळीला पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात? कारण आणि महत्त्व जाणून घ्या
या गावात एक बाजार असतो. ज्याला हाट असं म्हटलं जातं. गावातील सर्व लोक या बाजारात होळीचं सामान खरेदी करायला येतात. तर तरुण-तरुणी आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधायला येतात.
तरुण आपल्या हातात मांदल नावाचं एक वाद्य घेऊन ते वाजवतात आणि नृत्यही करतात. त्याचवेळी ते तिथं बसलेल्या तरुणींच्या गालावर गुलाल लावतात. ज्या तरुणीला तरुणाने गुलाल लावला तिने जर त्यालाही गुलाल लावला तर दोघंही एकमेकांना पसंत आहेत, असं समजलं जातं. त्यानंतर तरुण तरुणीला सर्वांसमोर पळवून घेऊन जातो.
हे वाचा - ...तर कुणीही सहजपणे तुमच्या प्रेमात पडेल; तज्ज्ञांनी सांगितली सोपी जादुई ट्रिक
झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार तरुण-तरुणींनी एकमेकांना रंग लावण्याच्या या परंपरेला या गावात तरुण-तरुणींची एकमेकांना असलेली पसंती मानली जाते आणि दोघांचं लग्न मानलं जातं. तरुणी कोणत्याही तरुणासोबत पळून जाऊ शकते आणि तिचं कुटुंब काहीच करू शकत नाही. जर गुलाल लावलेल्या तरुणीने तरुणाला गुलाल लावला नाही तर मग तो तरुण दुसऱ्या तरुणीला गुलाल लावतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Culture and tradition, Lifestyle, होळी