जाहिरात
मराठी बातम्या / Viral / महाराष्ट्रात 'इथे' लाखो रूपयांना विकलं जातंय एक गाढव; कारण माहितीये का?

महाराष्ट्रात 'इथे' लाखो रूपयांना विकलं जातंय एक गाढव; कारण माहितीये का?

महाराष्ट्रात 'इथे' लाखो रूपयांना विकलं जातंय एक गाढव; कारण माहितीये का?

मढी येथील यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार यंदा दोन दिवस अगोदरच तिसगाव परिसरात संपन्न झाला. त्यामुळे मढी येथील गाढवांच्या बाजारात मालाची टंचाई होऊन मोठी भाव वाढ झाली .

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

पाथर्डी 14 मार्च : राज्यात एका ठिकाणी गाढवांना लाखो रूपये किंमत मिळत असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं, तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे अगदी खरं आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी येथे भरणाऱ्या कानिफनाथांच्या यात्रेतील गाढवांचा बाजार प्रसिद्ध आहे. हजारो नाथ भक्त याठिकाणी एकत्र येतात. मढी येथील यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार यंदा दोन दिवस अगोदरच तिसगाव परिसरात संपन्न झाला. त्यामुळे मढी येथील गाढवांच्या बाजारात मालाची टंचाई होऊन मोठी भाव वाढ झाली . … तर तुम्ही एक रुपयाही न देता पार करु शकता टोल प्लाजा, काय आहेत नियम? यंदा प्रथमच पंजाब राज्यातून विक्रीसाठी गाढवं आली . सुमारे एक लाख रुपयांना एक पंजाबी गाढव विकले गेले . राज्यात माळेगाव, नांदेड, जेजुरी ‘देऊळगाव राजा ’ आणि मढी येथे गाढवांचा बाजार भरतो. आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगाना राज्यातूनही मढीच्या बाजारासाठी व्यापारी येतात. पूर्वीपासून मढी येथील गाढवांचा बाजार प्रचलित आहे . काठेवाड (गुजरात ) येथील गाढवांना मोठी मागणी असते . पांढरे शुभ्र, उंचीला जास्त आणि ओझे वाहायला चांगले असल्याने त्याची किंमत सुद्धा गावरान गाढवापेक्षा जास्त असते. यंदा काठेवाड प्रांतातून तीनशे गाढवे आली. सुमारे महिन्याभराची पायपीट करत गाढवे मढीकडे निघाली. वाटेत माल विकत विकत मढीपर्यंत 170 गाढवे राहिली. आंध्र प्रदेशासह मराठवाड्यातील प्रमुख व्यापाऱ्यांनी मढी पूर्वी तिसगाव येथे व्यापाऱ्यांशी सौदा करून सर्व गाढवे 25 ते 60 हजार रुपयांना प्रति नग अशी खरेदी केली, अशी माहिती दौलत भाई गधिया वाले काठेवाड यांनी दिली . मढी येथे यंदा नमुन्याला सुद्धा काठेवाडी गाढव पाहायला राहिले नाही. तुकाराम बीजेच्या दिवशी म्हणजे मढीच्या बाजाराच्या दोन दिवस अगोदर उलाढाल होऊन मढीच्या बाजारात अत्यंत तुरळक प्रमाणात गावरान गाढवे विक्रीसाठी आली . यावर्षीच्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा पंजाबी गाढवे विक्रीसाठी आली . अत्यंत उंचेपुरे ताकदवान अगदी घोड्यासारखी दिसणारी पंजाबी गाढवे, यात्रेकरुंचे खास आकर्षण ठरले. उत्तराखंड विशेषतः बद्रीनाथ केदारनाथ काश्मीरच्या परिसरात या गाढवांना खूप मागणी असते . लष्कराचे साहित्य डोंगराळ भागात अगदी सहजपणे व सुलभपणे वाहतूक करण्यासाठी याच गाढवांची मदत घेतली जाते. गाढवाची ही संकरित जात सध्या उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर उपयोगी ठरत आहे अशी माहिती करीम पहाडी उत्तराखंड यांनी दिली . यंदाच्या मढीच्या गाढवांच्या बाजाराविषयी माहिती देताना दत्तू जाधव ’ सोमनाथ जाधव (कोल्हार ) म्हणाले , दोन वर्षाच्या खंडानंतर पुन्हा गाढवांचा बाजार सुरू झाला. यंदा पंजाबी संकरीत गाढवांची सर्वाधिक किंमत येऊन दोन लाख 80 हजारांना तीन गाढवे विकली गेली.

News18लोकमत
News18लोकमत

बांधकाम व्यवसाय, वीट भट्टी क्षेत्रात गाढवांचा वापर आर्थिक दृष्ट्या लाभदायक ठरतो. ओझे वाहण्याची गाढवाची क्षमता चांगली असल्याने मजुरीच्या खर्चातही बचत होते . गेल्या वीस वर्षांपासून आपण मढी येथील गाढवांच्या बाजारासाठी येतो. यंदा मात्र आवक खूपच कमी झाली आहे. काही माल बाजारापूर्वीच तिसगाव येथे विकला गेला . राज्याच्या सर्वच प्रमुख भागातून खरेदी विक्रीसाठी व्यापारी आणि ग्राहक येतात. रंग, वय दातांची संख्या उंची यावरून गावरान गाढवाची किंमत ठरते .

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात