मॉस्को : कुत्रा (Dogs) हा एक अत्यंत हुशार आणि इमानदार पाळीव प्राणी. प्रामुख्याने संरक्षणासाठी कुत्रे पाळले जातात. एखादी वैशिष्ट्यपूर्ण मोहीम किंवा ऑपरेशनसाठी पोलिस दलं, सैन्य दलं कुत्र्यांची (Dog squad of Police) मदत घेतात. परंतु, कुत्रा कधी उडू (Flying) शकतो का? असा प्रश्न कुणी विचारला, तर तुम्ही प्रश्नकर्त्याकडे आश्चर्याने पाहून नकारार्थी उत्तर द्याल; पण आता या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी येईल, अशी परिस्थिती आहे. दुर्गम किंवा डोंगराळ भागात हेलिकॉप्टर्स किंवा विमानं उतरू शकत नाहीत, अशा क्षेत्रात पॅराशूटच्या (parachute) साह्याने कुत्र्यांना उतरवता येऊ शकेल का, याबाबतचा एक प्रयोग सध्या रशिया (Russia) करत आहे. या प्रयोगाचं व्हिडिओ फुटेज नुकतच व्हायरल झालं असून ते नेटिझन्सना खूप आवडलं आहे. आजपर्यंत सैन्य दल किंवा पोलिस दलाला मदत करून श्वानांनी जे योगदान केलं आहे, त्याची ही पुढील पायरी म्हणता येईल. झी न्यूजने याबाबतचं वृत्त दिलं आहे. टेक्नोडिनामिका (Technodinamika) या रशियन कंपनीने कुत्र्यांसाठी वापरता येऊ शकणारं एक पॅराशूट विकसित केलं असून, त्याचं परीक्षण नुकतंच करण्यात आलं. या परीक्षणावेळी एका व्यक्तीने कुत्र्यासोबत हेलिकॉप्टरमधून (Helicopter) उडी मारली. संरक्षणासाठी अजून 2 व्यक्तीही त्यांच्यासोबत होत्या. टेक्नोडिनामिका ही कंपनी रोस्टेक टेस्ट कॉर्पोरेशनचा एक भाग असून, त्या कंपनीने रशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानुसार हे उपकरण तयार केलं आहे. हे वाचा - बापरे! वर्षातले तब्बल 300 दिवस झोपतो पुरखाराम; कारण वाचून खिन्न व्हाल! सिंगल किंवा टेंडम जंपसाठी पॅराशूट हार्नेस डेव्हलप करण्यात आलं आहे. लँडिंगनंतर हे परीक्षण यशस्वी झाल्याचं मॉस्को टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. याबाबत पॅराशूटिस्ट प्रशिक्षक आंद्रेई तोरोपकोव यांनी सांगितलं, की सुरुवातीला विमानाचा दरवाजा उघडला की कुत्र्यांमध्ये थोडा तणाव दिसून येतो. त्यानंतर थोडा वेळाने ते शांत होतात. ही पॅराशूट निर्माती कंपनी डॉग पॅराशूट जंपसाठी असलेली कमाल उंचीची मर्यादा दुपटीने वाढवून 8000 मीटर करण्यासाठी काम करत आहे. हे परीक्षण या वर्षाअखेरीपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रशियन विमान उपकरण उत्पादक कंपनी पुढील वर्षापर्यंत सर्व्हिस डॉग्जसाठी एक पॅराशूट सिस्टीम (Parachute System) सुरू करण्याची योजना आखत आहे. टेक्नोडिनामिकाच्या पॅराशूटचं परीक्षण नुकतंच झालं असून, त्याच्या जबरदस्त लँडिंगचं फूटेज (Footage) व्हायरल झालं आहे. या फुटेजमधला थरार पाहून नेटिझन्स चांगलेच प्रभावित झाले आहेत. या फुटेजमध्ये एक जर्मन शेफर्ड डॉग 13,000 फुटांवरून उड्डाण करताना आणि खुल्या मैदानावर हळुवारपणे लँडिंग करताना पाहून नेटिझन्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.