जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video : ना माणुस ना बकरी... अजगराच्या पोटातून जे बाहेर आलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही

Video : ना माणुस ना बकरी... अजगराच्या पोटातून जे बाहेर आलं यावर तुमचा विश्वास बसणार नाही

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

अजगरासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक भला मोठा अजगर दिसत आहे आणि त्याच्या पोटात काही तरी असल्याचे दिसत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई १६ नोव्हेंबर : अजगर किंवा सापाचं नाव काढलं की लोक लांब पळतात. सापचा एक दंश माणसाला मृत्यू देण्यासाठी पुरेसा आहे. तर अजगराच्या तावडीत कोणीही आलं की तो त्याला विळखा घालूनच बसतो. तसेच अजगर कोणत्याही सजीवाला अख्खा गिळतो, हे देखील आपल्याला माहित आहे. तुम्ही या संदर्भात अनेक व्हिडीओ, पाहिलेच असणार. ज्यामध्ये अजगराने कधी एखादा माणूस, तर कधी एखादा प्राणी गिळल्याचे पाहिले असणार. पण सध्या अजगराचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्याटमध्ये अजगराने अशी गोष्ट गिळली आहे. जे पाहून तुम्हाला धक्का बसेल. हे ही पाहा : नशेत मच्छिमाराने गळ्यात गुंडाळला अजगर, पुढे जे घडलं ते… पाहा Video अजगरासंबंधीत एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक भला मोठा अजगर दिसत आहे आणि त्याच्या पोटात काही तरी असल्याचे दिसत आहे. जेव्हा त्या अजगराचे पोट फाडण्यात येते, तेव्हा त्यामध्ये असते ती मगर… हा व्हिडीओ पाहा, तुम्हाला तो पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल हा व्हिडीओ पाहाताने तुमचे मन विचलीत देखील होऊ शकते. जर तुम्हाला तो नसेल पाहायचा, तर तुम्ही तो बंद देखील करु शकता, पण हा व्हिडीओ खरा आहे, जो सत्य दाखवत आहे.

जाहिरात

इंस्टाग्राम आणि ट्विटरवर उपलब्ध असलेल्या व्हिडीओमध्ये 18 फूट लांबीच्या अजगराने 5 फूट मगरीला गिळल्याचे दिसून येते. अखेर पोट फाडून मगरीला बाहेर काढले जाते. पण तो पर्यंत ही मगर मेलेली असते. एका भागात अजगराचे शरीर सुजलेले दिसते. तज्ञांनी त्याचे शरीर एका बाजूने कापले आणि पुढील व्हिडीओत त्याचे पोट फाटलेले आहे आणि ज्यामध्ये मगरीच्या अकारासारखं काहीतरी दिसतं आणि मग हे तज्ज्ञ त्यातून बाहेर काढतात 5 फूट मगर. हा बर्मी अजगर असून त्याची लांबी १८ फूट असल्याचे सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा बर्मी अजगर जगातील सर्वात मोठ्या अजगरांपैकी एक आहे, ज्याची लांबी 20 फूटांपेक्षा जास्त असू शकते. ज्याने हा अजगर पाहिला त्याने त्याला मारले आणि नंतर संशोधन प्रयोगशाळेत आणले, जेणेकरून त्याचे विच्छेदन आणि नमुना घेता येईल आणि तेच सगळं या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. दक्षिण फ्लोरिडाचे उपोष्णकटिबंधीय हवामान बर्मी अजगरांना दीर्घायुष्य जगू देते आणि त्यांच्या कुटुंबाची वेगाने वाढत होते. जर तुमच्या मनात प्रश्न असेल की अजगर आपलं खाणं का गिळतात? तर समजून घ्या की अजगराच्या तोंडात दात असतात आणि ते सुईच्या टोकासारखे टोकदार असतात. पण त्यांचे दात आपल्यासारखं अन्न चघळायला आणि बारीक करायला मदत करत नाहीत. प्रथम ते शिकार इतके घट्ट पकडतात की त्यांचा जीव गुदमरतो.

News18लोकमत
News18लोकमत

अजगर फक्त आपले भक्ष्य पकडण्यासाठी दात वापरतात आणि नंतर हळू हळू गिळायला लागतात. मग ती शेळी असो, मानव असोत किंवा मग मगर ते सगळ्यांना गिळतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात