मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Toll वाचवण्यासाठी घेतला शॉर्टकट; Bolero ची अवस्था पाहून धक्काच बसेल, पाहा VIDEO

Toll वाचवण्यासाठी घेतला शॉर्टकट; Bolero ची अवस्था पाहून धक्काच बसेल, पाहा VIDEO

काही शे रुपये वाचविण्यासाठी कारचालकाला लाखोंचं नुकसान सहन करावं लागणार आहे.

काही शे रुपये वाचविण्यासाठी कारचालकाला लाखोंचं नुकसान सहन करावं लागणार आहे.

काही शे रुपये वाचविण्यासाठी कारचालकाला लाखोंचं नुकसान सहन करावं लागणार आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपूर, 22 जुलै : प्रवासाला जाताना अनेकदा शॉर्टकटचा मार्ग घेतला जातो. लवकर जाता येईल किंवा टोळ टाळता येईल यासाठी अगदी सहजपणे या रस्त्याच्या दिशेने पावलं वळतात. मात्र हा शॉर्टकट इतका जीवघेणा असून शकतो याचा कोणी विचारही केला नसेल. या घटनेटा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक बोलेरो गाडीने शॉर्टकट घेण्याच्या नादात कुठे येऊन पोहोचली हे तुम्ही व्हिडीओतून (shocking viral video) स्पष्ट दिसत आहे. (Shortcut taken to save toll You will be shocked to see Boleros condition watch the VIDEO)

हा व्हिडीओ जोधपूरमधील फलोदी तालुक्यातील आहे. येथील खिरवा टोल नाक्यावर टॅक्स वाचविण्यासाठी एक बोलेरो वाहन चालकाने शॉर्ट घेण्याचा निर्णय घेतला. या शॉर्ट कटमुळे त्याला टोल नाक्यापर्यंत जावं लागत नाही. मात्र या शॉर्टकटदरम्यान रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे रेल्वे मार्ग पार करून जावं लागतं. मात्र नेमक्या याच वेळी बोलेरे कार बंद पडली. नेमक्या रेल्वे ट्रॅकवर गाडी बंद पडली. तेवढ्याच समोरुन मालगाडी येत होती. चालक कार पुढे करण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र ते काही शक्य झालं नाही. आणि शेवटी मालगाडीने बोलेरो गाडीला धडक दिली. सुदैवाने यामधील प्रवासी आधीच गाडीतून उतरून गेले होते. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. या घटनेचा Live Video न्यूज 18 ला मिळाला आहे.

" isDesktop="true" id="582978" >

त्यामुळे शॉर्टकट घेताना तो किती सुरक्षित आहे, याचीही तपासणी करून घेणं गरजेचं आहे. अन्यथा जे हातात आहे तेदेखील राहत नाही.

 

First published:

Tags: Rajasthan, Shocking viral video, Viral video.