Home /News /viral /

कुत्र्याने केली कोंबड्याची हुबेहूब नक्कल; बांग देतानाच VIDEO पाहून व्हाल अवाक

कुत्र्याने केली कोंबड्याची हुबेहूब नक्कल; बांग देतानाच VIDEO पाहून व्हाल अवाक

सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Funny Video of Dog and Chicken) होत आहे. हा कुत्रा एका कोंबड्याची कॉपी करताना दिसतो.

  नवी दिल्ली 22 डिसेंबर : फेसबुक, यूट्यूब, ट्विटर हे असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, जिथे एखादा व्हिडिओ व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. एक काळ होता जेव्हा लोकांना केवळ टीव्हीवरच मजेशीर, हसवणारे आणि विनोदी व्हिडिओ पाहायला मिळायचे. मात्र आता सोशल मीडियाच्या निरनिराळ्या प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय विनोदी असतात तर काही व्हिडिओ भावुक करणारे असतात. मात्र विनोदी व्हिडिओ पाहायला लोकांना जास्त आवडतं. विशेषतः प्राण्यांच्या व्हिडिओला विशेष पसंती मिळते. तुम्ही अनेकदा लोकांच्या तोंडून कॉपी कॅट शब्द ऐकला असेल. मात्र, तुम्ही कधी कॉपी डॉगबद्दल (Copy Dog) ऐकलं आहे का? अंगावरून ट्रक गेला, तरी महिलेला खरचटलंही नाही; कॅमेऱ्यात कैद झाला थरार, VIDEO सध्या सोशल मीडियावर एका कुत्र्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Funny Video of Dog and Chicken) होत आहे. हा कुत्रा एका कोंबड्याची कॉपी करताना दिसतो. खरंतर कुत्र्याला अतिशय समजदार प्राणी मानलं जातं, कारण बऱ्याच गोष्टी तो लवकर शिकतो. मात्र व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये श्वानाचं अतिशय निराळं रूप पाहायला मिळतं. यात कुत्रा कोंबड्याप्रमाणेच बांग देताना दिसतो (Dog Bang like Chicken).
  व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की झाडाच्या बाजूला उभा राहून एक कोंबडा बांग देत आहे. त्याचा आवाज ऐकून कुत्राही त्याची हुबेहूब कॉपी करतो आणि कोंबड्याप्रमाणे बांग देतो. हा व्हिडिओ अतिशय मजेशीर असून नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. सहसा श्वान खेळ खेळायला किंवा मालकाचं सगळं बोलणं ऐकण्यासारख्या गोष्टी लवकर शिकतात. मात्र कोंबड्याप्रमाणे बांग देणं हे खरोखरच अनोखं टॅलेंट आहे, जे या श्वानाने शिकलं आहे. इथं लोक पार्क केलेली कार करत नाही लॉक; खिडकी, दरवाजा, डिग्गी उघडी ठेवतात कारण... हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर monushetty751 नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत 3 मिलियन म्हणजेच 30 लाखाहून अधिकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर, 2 लाख 70 हजारहून अधिकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. अनेकांनी यावर मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिलं, जा आधी तू व्यवस्थित इंग्लिश शिक. तर आणखी एकाने लिहिलं जीनियस डॉग.
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Chicken, Dog, Funny video

  पुढील बातम्या