जाहिरात
मराठी बातम्या / Viral / VIDEO - महिलेचा डोळा उघडून पाहताच डॉक्टर हादरले; एका सवयीचा दिसला भयानक परिणाम

VIDEO - महिलेचा डोळा उघडून पाहताच डॉक्टर हादरले; एका सवयीचा दिसला भयानक परिणाम

डोळ्यांबाबतचा हलगर्जीपणा महिलेला पडला महागात (प्रतीकात्मक फोटो/ सौजन्य - Canva)

डोळ्यांबाबतचा हलगर्जीपणा महिलेला पडला महागात (प्रतीकात्मक फोटो/ सौजन्य - Canva)

डोळ्यांबाबत महिलेने केलेला तिचा एक निष्काळजीपणा तिला चांगलाच महागात पडला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

वॉशिंग्टन, 14 ऑक्टोबर : आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही ना काही सवयी असतात. काही सवयी चांगल्या तर काही वाईट असतात. काही वाईट सवयींचे परिणाम आपल्याला तात्काळ दिसत नाहीत पण जेव्हा दिसतात तेव्हा ते भयानक असतात. असंच एका महिलेच्या बाबतीत घडलं. या महिलेलाही तिच्या वाईट सवयीचा भयंकर परिणाम पाहायला मिळाला. या प्रकरणामुळे डॉक्टरही हादरले. हा धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील ही घटना आहे. महिलेला डोळ्यात त्रास होत होता. डोळ्याच्या समस्येवर उपचारासाठी म्हणून ती डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी तिच्या डोळ्यांची तपासणी केली. डॉक्टरांनी डोळा उघडून पाहिला आणि त्यांना महिलेच्या डोळ्यात जे दिसलं ते पाहून त्यांनासुद्धा धक्का बसला. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता डॉक्टरांनी महिलेचा एक डोळा उघडला आहे. तिच्या पापण्या वर केल्या आहेत. तिच्या पापण्याखाली तुम्ही पाहू शकता हिरव्या रंगाचं काहीतरी दिसतं आहे. डॉक्टर वैद्यकीय उपकरणाच्या मदतीने महिलेच्या डोळ्यातील तो हिरवा भाग बाहेर काढतात. असे एक-दोन नव्हे तर बरेच हिरवे वर्तुळ बाहेर पडतात.

News18लोकमत
News18लोकमत

तुम्हाला आश्चर्य वाटेल हे कॉन्टॅक्ट लेन्स आहेत. महिलेच्या डोळ्यांतून असे एक-दोन नव्हे तर तब्बल 23 कॉन्टॅक्ट लेन्स महिलेच्या डोळ्यांतून बाहेर काढताना दाखवण्यात आले आहेत. हे वाचा -  Shocking! अंघोळ करताना एक चूक आणि महिलेने कायमची गमावली डोळ्याची दृष्टी या व्हिडीओत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला दिवसा कॉन्टॅक्ट लेन्स लावायची आणि रात्री ते डोळ्यातून न काढताच तशीच झोपायची. सलग 23 दिवस तिने असं केलं. महिलेच्या पापणीखाली हे कॉन्टॅक्ट लेन्स तसेच राहिले. महिनाभर ते तिथेच चिकटून होते.

जाहिरात

एका आय स्पेशालिस्टने@california_eye_associates इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटिझन्स हैराण झाले आहेत. हे वाचा -  बापरे! डोळ्यात घुसल्या 3 जिवंत माश्या; उपचारासाठी अमेरिकन महिला भारतात त्यामुळे तुम्हीही कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर काळजी घ्या. या महिलेने जी चूक केली ती तुम्ही करू नका. कॉन्टॅक्ट लेन्स लावण्याच्या नियमांचं पालन करा. कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यानंतर या गोष्टी करणं टाळा 1) लेन्स घालून झोपणं – लेन्स लावून झोपल्याने डोळ्यातील ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि लेन्सवरील जंतू, बॅक्टरिया आपल्या डोळ्यात शिरतात. त्यामुळे रात्री झोपताना आठवणीने डोळ्यातील लेन्स काढून ठेवा. 2) लेन्स लावून उष्ण ठिकाणी जाणं – लेन्स लावले असताना गॅसजवळ, विस्तवाजवळ, डायरेक्ट उन्हात वगेरे जाणे टाळावे. उष्णतेमुळे लेन्स आणि डोळ्यांना ईजा होते. 3) लेन्स लावून पाण्यात जाणं – डोळ्यात लेन्स असताना अंघोळ करणं, चेहरा धुणं, पोहायला जाणं, पावसात भिजणं टाळा. 4) मेकअप – लेन्स लावल्या असताना मेकअप करत असाल तर मेकअप सेटिंग स्प्रे वापरणं टाळा किंवा वापरताना डोळे नीट बंद करून घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात