जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / Shocking! अंघोळ करताना एक चूक आणि महिलेने कायमची गमावली डोळ्याची दृष्टी

Shocking! अंघोळ करताना एक चूक आणि महिलेने कायमची गमावली डोळ्याची दृष्टी

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

अंघोळ करताना महिलेचा निष्काळजीपणा तिला चांगलाचा महागात पडला.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

लंडन, 10 ऑक्टोबर : अंघोळ करताना डोळ्यात साबण गेला की डोळे जळजळणं हे काही नवं नाही पण कधी अंघोळ करताना कुणाच्या डोळ्याची दृष्टी गेल्याचं तुम्ही ऐकलं आहे का? पण एका महिलेच्या बाबतीत हे घडलं आहे. महिलेने अंघोळ करताना एक चूक केली आणि तिने आपल्या डोळ्याची दृष्टी आयुष्यभरासाठी गमावली. महिलेने आपला हा अनुभव लोकांसोबत शेअर करत लोकांना सावध केलं आहे. मॅरी मॅनसॉन असं या महिलेचं नाव आहे. 54 वर्षांची मॅरी. एक दिवस अंघोळ केल्यानंतर मॅरीला डोळ्यात इन्फेक्शन झालं आणि तिच्या एका ़डोळ्याची दिसणं बंद झालं. ती डॉक्टरांकडे गेली  तेव्हा तिच्या डोळ्यात पाण्यातील अमिबा गेल्याचं समजलं, यामुळे हे इन्फेक्शन झालं होतं. हा अमिबा तिच्या डोळ्यातील कॉर्निया आणि कॉन्टॅक्ट लेन्समध्ये अडकलं होता. हे वाचा -  शिंकताना डोळे बंद का होतात? जाणून घ्या यामागचं कारण आता यात मॅरीची चूक म्हणजे ती डोळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स घालूनच अंघोळीला गेली. तिचा हाच निष्काळजीपणा तिला महागात पडला. तिचे हे लेन्स एक महिन्यापुरती होते. पण यामुळे तिने आयुष्यभरासाठी आपली दृष्टी गमावली.

News18लोकमत
News18लोकमत

मॅरीने सांगितलं की तिने ऑपरेशनही केलं पण काहीच फायदा झाला नाही. तिचे डोळे काढावे लागले. या घटनेनंतर तिचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. एका डोळ्याची दृष्टी गमावल्यानंतर तिला दैनंदिन कामात बऱ्याच अडचणी येत आहेत. महिलेने आपला हा अनुभव शेअर केल्यानंतर लोकांना लेन्स काळजीपूर्वक वापरण्याचा सल्ला दिला आहे. कॉन्टॅक्ट लेन्स लावल्यानंतर या गोष्टी करणं टाळा 1) लेन्स घालून झोपणं – लेन्स लावून झोपल्याने डोळ्यातील ऑक्सिजन पुरवठा कमी होतो आणि लेन्सवरील जंतू, बॅक्टरिया आपल्या डोळ्यात शिरतात. त्यामुळे रात्री झोपताना आठवणीने डोळ्यातील लेन्स काढून ठेवा. 2) लेन्स लावून उष्ण ठिकाणी जाणं – लेन्स लावले असताना गॅसजवळ, विस्तवाजवळ, डायरेक्ट उन्हात वगेरे जाणे टाळावे. उष्णतेमुळे लेन्स आणि डोळ्यांना ईजा होते. 3) लेन्स लावून पाण्यात जाणं – डोळ्यात लेन्स असताना अंघोळ करणं, चेहरा धुणं, पोहायला जाणं, पावसात भिजणं टाळा. 4) मेकअप – लेन्स लावल्या असताना मेकअप करत असाल तर मेकअप सेटिंग स्प्रे वापरणं टाळा किंवा वापरताना डोळे नीट बंद करून घ्या. कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना काय काळजी घ्यायची? 1) तज्ज्ञांकडून सल्ला – लेन्स वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे फार आवश्यक आहे. त्या आपल्या डोळ्याला सूट होतात का, कोणत्या प्रकारच्या लेन्सेस वापराव्या हे जाणून घ्या. 2) हात धुणे – प्रत्येक वेळी लेन्सना स्पर्श करताना आपले हात साबणाने स्वच्छ धऊन, नीट पुसून वळवून घ्या. हातचे पाणी लेन्सला किंवा त्या सोल्युशनमध्ये मिसळता कामा नये. 3) तेच तेच सोल्य़ुशन वापरू नका - लेन्स स्वच्छ करण्यासाठी एकदा वापरलेलं सोल्युशन टाकून द्या. थोडे पैसे वाचवण्याचा नादात सोल्युशनचा उपयोग करणं टाळा. 4) लेन्स वापरण्याचा कालावधी – लेन्स ओरिजिनल पॅकिंगमधून काढल्यानंतर जास्तीत जास्त किती दिवस वापरू शकता हे आधी विचारून घ्या. अवधी संपला की त्या लेन्स टाकून द्या आणि नवीन लावा. हे वाचा -  Eyes Health Care Tips: डोळे निरोगी ठेवण्यासाठी आहारापासून या गोष्टींचीही घ्या काळजी, फॉलो करा 4 टिप्स 5) लेन्स केस – आपल्या लेन्स सुरक्षित आणि जंतू विरहित ठेवण्याकरता लेन्स केसच वापरा. ती केस वेळचे वेळी स्वच्छ करून घ्या. दर 2-3 महिन्यात ती केस बदला. प्रवास करताना लेन्स केस सोबत ठेवा. 6) लेन्स खाली पडल्यास – लेन्स जर खाली पडली, तर भरपूर क्लीनिंग सोल्युशनने नीट स्वच्छ करून मगच वापरा. 7) पापण्यांची हालचाल – लेन्स लावल्यावर आपल्या पापण्यांच्या नैसर्गिक हालचालींवर बंधन घालू नका. त्याने तुमच्या डोळ्यांना अजिबात ईजा होणार नाही. 8) लेन्सचा त्रास होत असल्यास – लेन्स लावल्यानंतर जर डोळ्यातून पाणी, डोळ्यांची आग, लालसर होणं, दुखणं, खाज येणं यापैकी एकही समस्या उद्भवल्यास त्या लेन्स त्वरित डोळ्यातून काढून टाका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात