भोपाळ, 19 ऑक्टोबर : दिवाळी म्हटलं की भरमसाठ ऑफर्सही आल्या. कपडे, दागिने, घरातील सामान अशा बऱ्याच गोष्टींवर ऑफर्स दिल्या जातात. दुकानदार ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. पण कधी कोणत्या रुग्णालयाला दिवाळीची ऑफर देताना पाहिलं आहे का? फक्त वाचूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. एका रुग्णालयाने चक्क दिवाळीची ऑफर दिली आहे. जी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते आहे. मध्य प्रदेशच्या आगर मालवा जिल्ह्यातील आरोग्य विभागाने ही विचित्र ऑफर देऊ केली आहे. टीबी रुग्णांना घेऊन या आणि त्या बदल्यात रोख रक्कम किंवा सोनं-चांदी, मोबाईलसह बऱ्याच वस्तूंची ऑफर रुग्णालयाने दिली आहे. इथं टीबी रुग्णांना आणणाऱ्यांना 500 रुपयांपासून 50 हजार रुपयांपर्यंतची ऑफऱ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचं एक पोस्टरही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हे वाचा - गॅस…लॉक…खत्म…! पोटातील गॅसवरील विचित्र उपचाराचा हा VIDEO पाहूनच चक्रावाल पोस्टरमध्ये तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय टीबी निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत दिवाळीसाठी योजना सुरू करण्यात आली आहे. नवीन टीबी रुग्ण आणा आणि बक्षीस मिळवा अशी ही योजना आहे. टीबी रुग्णांच्या संख्येनुसार बक्षीस दिलं जाणार आहे. एका रुग्णाला भरती तेलं तर 500 रुपये किंवा टिफिन मिळणार. 5 रुग्णांना भरती केलं तर 2500 रुपये किंवा मिक्सर मिळणार 10 रुग्णांना आणलं तर 5000 रुपये किंवा मोबाईल दिला जाईल. 15 रुग्णांना आणणाऱ्यांना 7500 रुपये किंवा 10 ग्रॅमचं चांदीचं नाणं 40 रुग्ण असतील तर 4 ग्रॅम सोन्याचं नाणं किंवा 20 हजार रुपये मिळतील.
टीबी रोग से निपटने के लिए आगर मालवा में स्वास्थ्य विभाग ने अब इनामी योजना चलाई है .... 500 से लेकर 50000 रुपए तक की इनामी राशि #tuberculosis@CollectorAgar @brajeshabpnews @Anurag_Dwary @ManojSharmaBpl @Sandeep_1Singh_ @Gurjarrrrr @healthminmp @akankshasxn @yogital pic.twitter.com/psOW3IBmkZ
— jaffer multani (@jaffer_multani) October 18, 2022
रुग्णालयाच्या मते, टीबी आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. लोकांनी रुग्णालयात येऊन उपचार घ्यावेत यासाठी हे प्रयत्न आहेत. हे वाचा - Dengue Treatment : फक्त एक रुपयात बरा होईल डेंग्यू; डॉक्टरांनीच दिला उपचार 24 ऑक्टोबरपासून 31 डिसेंबरपर्यंत ही ऑफऱ लागू असेल, असंही या पोस्टरमध्ये नमूद करण्यात आलं आहे.