तरुणीच्या बेबी बम्पच्या आकाराची सोशल मीडियावर चर्चा; कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल!

दुसऱ्या व्हिडिओमध्ये, हुर्लेने आपल्या पोटाचा लहान आकार, प्रसूतीकाळातील अनुभवाचा (Labour Experience) व्हिडीओ शेअर केला आहे

दुसऱ्या व्हिडिओमध्ये, हुर्लेने आपल्या पोटाचा लहान आकार, प्रसूतीकाळातील अनुभवाचा (Labour Experience) व्हिडीओ शेअर केला आहे

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 जुलै : अनेक सेलिब्रिटी महिला (Celebrity Women) प्रेग्नसीच्या (Pregnancy) कालावधीत आपले बेबी बम्पचे (Baby Bump) फोटो सोशल मीडीयावरुन शेअर करत असतात. त्यांचा प्रेग्नसीचा प्रवास, आगामी बाळाविषयी त्यांचे नियोजन, बेबी बम्पचा आकार, त्यांची सध्याची जीवनशैली अशा गोष्टींवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून चर्चा होते. फॅन्सही या सर्व गोष्टींना भरघोस प्रतिसाद देत असतात. त्यामुळे एखाद्या सेलिब्रिटी महिलेचा प्रेग्नसी कालावधी अनेकदा प्रमाणापेक्षा अधिक चर्चेत येतो. परंतु, रिबेका हुर्ले (Rebecca Hurley) ही कोणी सेलिब्रिटी नाही. परंतु, प्रेग्नसीच्या कालावधीतील तिच्या बेबी बम्पचा आकार सोशल मीडियात (Social Media) जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे. ज्या प्रमाणे आरोग्याशी संबंधित कोणाताही अनुभव हा व्यक्तीपरत्वे वेगळा असतो त्याचप्रमाणे गर्भधारणा आणि बेबी बम्पचा आकारदेखील प्रत्येक स्त्रीपरत्वे वेगळा असतो. रिबेका हुर्ले हे याचेच प्रातिनिधीक उदाहरण म्हणता येईल. लहान बेबी बम्प असल्यामुळे रिबेका प्रेग्नंट आहे, हे लोकांना माहिती नव्हते. परंतु, मी जुळ्या बालकांना जन्म दिल्याचे खुद्द रिबेकाने सांगितले आहे. आता रिबेका एकूण 5 मुलांची आई असून, तिने तिच्या बेबी बम्पचे फोटो (Photo) आणि व्हिडीओ (Video) तिच्या सोशल मिडीया हॅण्डलवरुन शेअर केले आहेत. हे ही वाचा-बेपत्ता कुत्रा गॅरेजच्या भिंतीत कसा पोहोचला? अग्निशमन दलानं केली सुटका
  View this post on Instagram

  A post shared by Rebecca Hurley (@nolanohana)

  जरी रिबेका आपला प्रेग्नसी कालावधी पूर्ण करत होती तरीही तिचे बेबी बम्प म्हणजेच पोटाचा घेर फारसा मोठा नव्हता. हुर्लेने आपल्या बेबी बम्पचे मागील बाजूने आणि एका बाजूने फोटो काढून ते शेअर केले मात्र तिच्या बेबी बम्पची साइज बघून नेटिझन्स आश्चर्यचकीत झाले. तिच्या प्रेग्नसीबाबत अनेकांना खात्री पटली नाही. त्यामुळे आपणही आश्चर्यचकित असून त्याबद्दल वैद्यकीय सल्ला घेत आहोत असं तिनी सांगितल्याचं एका वृत्तात म्हटलं होतं, सोशल मीडियावर तिने टाकलेल्या व्हिडिओत हुर्ले म्हणाली की माझ्या पोटाचा आकार ना पुढील बाजूने आणि ना मागील बाजूने मोठा दिसत नाही. कोणत्याच बाजूने काही दिसत नसले तरी मी वैद्यकीय सल्ला घेत आहे आणि काळजीही. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, हुर्लेने आपल्या पोटाचा लहान आकार, प्रसूतीकाळातील अनुभवाचा (Labour Experience) व्हिडीओ शेअर केला असून, मी जुळ्या बाळांना जन्म दिल्याचा खुलासा देखील तिने केला आहे. 5 मुलांची आई असलेल्या हुर्लेने सांगितले की तिच्या आयुष्यात 5 आठवड्यांपूर्वी सारखा चेहरा असणाऱ्या जुळ्या मुलींनी प्रवेश केला आहे आणि त्यांची प्रकृती चांगली आहे. या दोन्ही मुलींचे वजन 2 किलोग्रॅम आहे. आपल्या पोटाच्या लहान आकाराविषयी विनोद करताना हुर्ले म्हणते की या एवढ्याश्या बेबी बंपने माझ्या दोन बाळांना सामवून घेतलं होतं. तिने तिच्या प्रेग्नसीच्या प्रवासाबाबतची सविस्तर माहिती इन्स्टाग्राम अकाउंटवरुन (Instagram Account) शेअर केली आहे. त्यावर अनेक नेटिझन्सने प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
  First published: