मुंबई 28 सप्टेंबर : प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण सुंदर दिसावं आणि त्यासाठी अनेक लोक खूप मेहनत देखील घेतात. केस कापण, फेशिअर करणे यांसारख्या गोष्टी लोक करु लागतात. परंतू बहुतांश लोकंचा हा समज आहे की डोक्यावर जाड आणि काळेभोर केस असले की, व्यक्ती सुंदर दिसते. परंतू ज्या लोकांच्या डोक्यावर कमी केस असतात किंवा केसच नसतात. अशा लोकांना समाजात वावरत असताना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. बऱ्याचदा पुरुषांमध्ये टक्कल होण्याचं प्रमाण जास्त आहे, ज्यामुळे लग्न करताना देखील त्यांना अनेक प्रॉबलम्स उद्भवतात. ज्यामुळे मग काही लोक विग लावणे किंवा हेअर ट्रांसप्लांट करण्याच्या पर्यायांकडे वळतात. तुम्ही देखील असंच काही करण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा… कारण सुंदर दिसणं तुमच्या जिवावर बेतू शकतं. दिल्लीमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे, जे खूपच धक्कादायक आहे. तसेच याबद्दल जाणून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. खरंतर दिल्लीत एका सलूनमध्ये केस ट्रांसप्लांटच्या प्रक्रियेमुळे एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नागपुरातही बोगस हेअर ट्रांसप्लांटचं रॅकेट उघड झालं ज्यामध्ये जवळ-जवळ 300 लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. हे वाचा : 22 व्या वर्षी ड्रिम जॉब, 58 लाखांचा पगार… पण जॉईनिंग आधीच संपलं तरुणाचं आयुष्य हेअर ट्रांसप्लांटमुळे पटणा, अहमदाबाद, डेहराडून, मुंबई, दिल्ली आणि चेन्नईमध्ये मागील 5 वर्षांमध्ये 6 जणांचा नाहक बळी गेला आहे. खरंतर लोकांना सुंदर दिसण्याची किंवा हेअर ट्रान्सप्लांट करण्याची इतकी घाई असते की ते संबंधित क्लिनिक, तसेच डॉक्टर आणि प्रक्रिया याची पूर्ण माहिती न घेताच ट्रिटमेंट घेतात. ज्यामुळे चुकीच्या उपचारांचा उलटा प्रभाव पडतो. हे सगळं प्रकरण पाहाता, त्यांना आळा घालण्यासाठी दिल्ली सर्वोच्च न्यायालयाला याची दखल घ्यावी लागली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नॅशनल मेडिकल कमिशनने यासंदर्भात काही नियमावली जाहीर केली आहे. ज्याअंतर्गत काही ठरावीक डॉक्टर आणि क्लिनिकला हेअर ट्रान्सप्लांन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हे वाचा : नवरा तिला ‘काळी’ म्हणून टोमणे मारायचा, अखेर संतापलेल्या बायकोनं पुसलं स्वत:चं कुंकु चला जाणून घेऊ की हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी कोण करु शकतात? - ज्या डॉक्टरांकडे सर्जिकल प्रशिक्षण आहे, तसेच रक्त तपासणीचं ज्ञान आहे, तसेच डीएनबी, प्लास्टिक सर्जरी, त्वचाविज्ञानाचा अभ्यासक डॉक्टर हवा. - तसेच शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाची विशेष काळजी घ्यावी लागते, म्हणून क्लिनिकमध्ये यासंदर्भात सुविधा असाव्यात. तसेच अशा फसवणूकीपासून वाचण्यासाठी लोकांनी स्वत: सतर्क असणे गरजेचे आहे. कुठेतरी सोशल मीडियावर माहिती मिळवून किंवा एखाद्याचा नंबर मिळवून तुम्ही हेअर ट्रान्सप्लांट करु नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.