जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Unknown Fact : हिरा जिभेने चाटला तर माणसाचा मृत्यू होतो, काय आहे यामागचं तथ्य?

Unknown Fact : हिरा जिभेने चाटला तर माणसाचा मृत्यू होतो, काय आहे यामागचं तथ्य?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

काही लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीने हिरा चाटला तर त्याचा मृत्यू होतो. पण हे तर फक्त बोललं जातं, आता यामध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेऊ.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 02 जानेवारी : आपल्याला तर हे माहित आहे की सोन्याला सर्वात जास्त डिमांड आणि याचे दागिने सर्वात महाग असतात. आपल्या भारतीयांना सोनं सगळ्यात जास्त आवडतं. पण त्या तुलनेत हिरा किंवा हिऱ्याचे दागिने हे देखील सर्वात महाग असतात. तसे पाहाता हिऱ्यांचे अनेक प्रकार असतात. ज्यामध्ये काही हिरे हे अगदी स्वस्तात मिळतात तर काहिंची किंमत अगदी करोडो रुपयात देखील असतेल. हिऱ्यांचा वापर दागिने बनवणे, काच कापणे अशा इतर कामांमध्ये केला जातो. तुम्ही विज्ञानात वाचलं असेल की हिरा हा पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ आहे जो कार्बनचे घनरूप आहे. याशिवाय हिऱ्याला कार्बनचे शुद्ध स्वरूप म्हटले जाते. या पारदर्शक रत्नातून सहज पाहता येते. हिरे कॅरेटमध्ये मोजले जातात. हे ही पाहा : ना Hight पाहिली ना weight पाणघोड्यावर चढली थेट, पुढे सिंहिणंचं काय झालं तुम्हीच पाहा Video हिऱ्यांशी संबंधित अशा काही गोष्टी आहेत, ज्याबद्दल तुम्ही बरंच काही ऐकलं असेल. जसे की काही लोकांचा असा विश्वास आहे की जर एखाद्या व्यक्तीने हिरा चाटला तर त्याचा मृत्यू होतो. पण हे तर फक्त बोललं जातं, आता यामध्ये किती तथ्य आहे हे जाणून घेऊ. डायमंडचे Unknown Fact हिरा चाटल्याने माणसे मरतात, असे अनेक लोक अजूनही मानतात. पण असं नाही. हिरा हा विषारी पदार्थ नसल्यामुळे असे होत नाही. पण हो हिरा गिळणे तुम्हाला नक्कीच धोक्यात आणू शकते. हिरा इतका कठोर का होतो? कार्बनपासून बनवलेल्या हिऱ्याच्या कडकपणाचे रहस्य म्हणजे त्याची रासायनिक रचना ज्यामध्ये कार्बनचे अणू एकमेकांशी खूप घट्ट बांधलेले असतात. यामध्ये, एक कार्बन अणू इतर चार कार्बन अणूंशी जोडला जातो आणि टेट्राहेड्रल भूमिती रचना तयार करतो. हिऱ्याच्या वजनाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे 1 कॅरेट सुमारे 200 मिलीग्राम इतके असते.

News18लोकमत
News18लोकमत

जर तुम्हाला वाटत असेल की हिऱ्याला तुम्ही दातांनी तोडू शकता, तर असं करणं जवळ-जवळ अशक्यच आहे. यामागचं कारण आहे त्याची रचनाच. त्यामधील कार्बन पार्टीकल्स अशापद्धतीने घट्ट पकडलेले असतात की, तो दातांनी तोडणे अशक्य आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात