नवरा-नवरीचा डान्स आता तसा काही नवीन नाही. लग्नात आपल्या होणाऱ्या जोडीदाराला सरप्राइझ द्यायचं म्हणून नवरा किंवा नवरी छानसा रोमँटिक डान्स करताना दिसतात. असे बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अगदी वरातीत नवरा-नवरी नाचतात. पण या जोडप्यांचा डान्स काही निराळाच आहे. हे वाचा - एका ग्लासमुळे फुटलं नवरदेवाचं बिंग, लग्नातच दिसलं त्याचं खरं रूप; VIDEO VIRAL नवरदेव आणि नवरीबाई रस्त्यात विचित्र डान्स करताना दिसले. दोघांची लग्नात बांधलेली लग्नगाठही सुटली नाही. लग्नानंतर हे दोघंही तसेच थेट रस्त्यावर गेले आणि जसा जमेल तसा डान्स करायला सुरुवात केली. डान्स करताना आपण नवरा-नवरी आहोत याचा जणू त्यांना विसरच पडला आहे. आपल्या आजूबाजूला इतर लोक आहे, याचंही भान त्यांना राहिलेलं दिसत नाही. दोघं बस्सं नाचण्यात दंग आहेत. बरं ते नाचतातही अगदी विचित्र. म्हणजे त्यांच्या डान्स स्टेप्स पाहून हसूच येतं. हे वाचा - आंदोलन, संप नाही तर थेट जेसीबी आणला आणि...; पगारासाठी कर्मचाऱ्याने काय केलं पाहा नवरा-नवरीचा हा खतरनाक डान्स नेटिझन्सना खूप आवडला आहे. यावर बऱ्याच मजेशीर कमेंट येत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Dance video, Viral, Viral videos, Wedding video