मुंबई, 26 जून : भारतात लग्न खूप थाटामाटात केलं जातं, जणू काही एखादा सण. यावेळी सर्व नातेवाईकांपासून ते मित्रमंडळीपर्यंत सर्वांना आग्रहाचं आमंत्रण असतं. याकाळात सगळेच लोक खूप मजा करतात. अशावेळी मित्रमंडळी एकमेकांची मजा घेण्याचं चान्स सोडत नाहीत. मस्करी शिवाय लग्नाचा कार्यक्रम पारच पडू शकत नाही. यासंबंधीत एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरनार नाही. या व्हिडीओत काही मित्र लग्नानंतर रिसेप्शनला पोहोचले होते. स्टेजवर या जोडप्याला लग्नाच्या भेटवस्तू म्हणून या मित्रांनी वेगवेगळ्या वस्तू दिल्या, या वस्तू पाहून नववधूला देखील हसू आवरत नाही. हा व्हिडीओ तुमचा देखील दिवस बनवेल. लग्नाचा मंडप क्षणात झाला कुस्तीचं मैदान, नववधू-नवरदेवाच्या मारामारीचा Video Viral सगळ्या मित्रांनी एक-एक करत वस्तू आपल्या वहिनीच्या हातात द्यायला सुरुवात केल्या. त्यांनी ज्या गोष्टी भेटवस्तू म्हणून आणल्या होत्या त्या काही मजेदार तर काही विचित्र होत्या ज्या सर्वांसमोर मान खाली घालायला भाग पाडणाऱ्या होत्या. यावस्तूंमध्ये किचनपासून साफसफाईपर्यंतच्या वस्तूंचा समावेश होता. काहींनी वधूला लाटणं दिलं, तर काहींनी टॉयलेट क्लिनिंग ब्रश दिला. एका व्यक्तीने एक बादलीही भेट दिली. अशा भेटवस्तू पाहून वधूला हसू आवरता आले नाही. भेटवस्तू देण्याचा व्हिडीओ स्टेजवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आणि शेअर केला, त्यानंतर तो व्हायरल झाला आहे. बायको प्रियकरासोबत बेडवर असताना कॅमेरा घेऊन पोहोचला नवरा आणि… Video कैद झाला संपूर्ण प्रकार मित्र बायकोला असे काही विचित्र गिफ्टस देत होते, जे पाहून नवरदेवालाही विचित्र वाटलं आणि त्याने आपल्या एका मित्राला मजेनं डोक्यात देखील मारलं. पण त्याचा काही फायदा होणार नव्हता. कारण त्याच्या मागे आणखी काही मित्र विचित्र गिफ्ट्स घेऊन थांबले होते. तसे पाहता हा व्हिडीओ जूना आहे. परंतू आता पुन्हा तो सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. ज्याचा आनंद नेटकरी घेत आहेत. हा व्हिडीओ खरोखर खूपच मजेदार आहे.
या व्हिडीओला असंख्य लाईक आणि शेअर आले आहेत. तसेच या व्हिडीओला अनेक कमेंट्स देखील आल्या आहेत. अनेकांना या नव्या नवरीचं हसणं आवडलं आहे. तर काहींनी आपल्या मित्रांना टॅग करत आपण देखील असा प्रकार करु असं सांगितलं आहे. तर काहींनी या जोडप्याला आशीर्वाद दिला आहे.