डेट्रॉईट, 26 ऑगस्ट : अमेरिकेच्या मिशिगन राज्यातील डेट्रॉईट शहरात एक भयंकर प्रकार घडला. मृत झालेली व्यक्ती अखेरच्या क्षणी उठून बसणं हे सर्व प्रकार सिनेमांमध्ये आपण सर्रास पाहतो. मात्र खऱ्या आयुष्यात असे प्रकार घडले तरी याचा आनंद कमी आणि धक्का जास्त बसतो. येथील 20 वर्षीय मुलीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते. त्याचवेळी ही तरुणी उठून बसली. हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला. डेट्रॉईट येथील एका कुटुंबाने रविवारी 20 वर्षीय मुलगी प्रतिसाद देत नसल्याचे कळल्यानंतर डॉक्टरांना बोलवले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, मात्र तरुणीची परिस्थिती गंभीर होती.त्यानंतर तिला आपत्कालीन कक्षात हलवण्यात आले. वाचा- 12 वर्षांची मृत मुलगी अंगाला पाणी लागताच उठून बसली, नेमकं काय घडलं? आपत्कालीन कक्षातील डॉक्टरांनी घटनास्थळावरून दिलेल्या वैद्यकीय माहितीच्या आधारे रुग्णाला मृत घोषित केले. ओकलँड काऊन्टीच्या वैद्यकीय परीक्षकांच्या कार्यालयाने सांगितले की, की या तरुणीचा मृतदेह कदाचित शवविच्छेदन न करता कुटुंबाला देण्यात आला. डॉक्टरांनी मृतदेह दिल्यानंतर या तरुणीच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह डेट्रॉईटमधील जेम्स एच कोल येथे नेले. मात्र अंत्यसंस्काराआधी एक विचित्र प्रकार घडला. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना तरुणी जिवंत असल्याचे कळले. अंत्यसंस्कार करण्याआधीच या तरुणीने डोळे उघडले. या तरुणीची तब्येत गेल्या काही दिवसांपासून नाजूक होती. मात्र डॉक्टरांनी केलेल्या चुकीमुळे एक मोठा अनर्थ टळला. वाचा- 18व्या मजल्यावरून खाली वाकून पाहत होता 4 वर्षांचा मुलगा, तोल गेला आणि… याआधी रशियात घडला होता असा प्रकार रशियामध्ये एक 81 वर्षांची आजी मृत घोषित केल्यानंतर जिवंत असल्याचे कळले. झिनिडा कोनोकोव्हाची असे या 81 वर्षीय आजींचे नाव असून त्याच्यावर 14 ऑगस्ट रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रीयेनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 1 वाजून 10 मिनिटांनी त्याचे शव शवगृहात ठेवण्यात आले. काम करत असलेल्या कर्मचारीनं पाहिले की कोनोकोव्हाची उठून बसल्या आहेत, आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. 81 वर्षीय कोनोकोव्हा यांनी पळण्यास सुरुवात केल्यानंतर महिला कर्मचारीनं त्यांना पकडले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.