जकार्ता, 25 ऑगस्ट : याआधी कबरीतून एका जिवंत माणसाला बाहेर काढल्याच्या प्रकारनंतर आणखीन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतर काही तासात ती पुन्हा जागी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंडिनेशियातील ईस्ट जावा परिसरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली. या मुलीच्या अंत्यविधीसाठी मृतदेहाला अंघोळ घालण्यात आली त्यावेळी अचानक मृत झालेली मुलगी जिवंत होऊन उठून बसली आणि बोलायला लागली. हे पाहून कुटुंबियांचा आनंद गगनात मावेनासा झाला मात्र हा आनंद फारकाळ टिकू शकला नाही. तासाभरात या मुलीचा पुन्हा मृत्यू झाला.
महिलेनं दिलेल्या माहितीनुसार तिच्या मुलीचं शरीर थंड पडलं होतं. पण अचानक हृदयाचे ठोके वाजण्यास सुरुवात झाली आणि शरीरात उष्णता निर्माण झाली. मृतदेहावर पाणी पडल्यानंतर मुलगी उठून बसली आणि चक्क बोलूही लागली होती.
Dead girl, 12, ‘wakes up’ while family clean her body for burial in Indonesia https://t.co/xFdxRcwujg
— Daily Mail Online (@MailOnline) August 25, 2020
'डेली मेल'नं दिलेल्या वृत्तानुसार मुलगी पुन्हा जिवंत पाहून घरचेही हैराण झाले आणि त्यांनी डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी मुलीला ऑक्सिजन देऊन पुन्हा नॉर्मलवर आणण्याचा प्रयत्न केला मात्र सगळे प्रयत्न अपयशी झाले. या मुलीचा तासाभरात मृत्यू झाला. सीती मासफूफाह असं या मुलीचं नाव सांगितलं जात आहे.
हे वाचा-खारी-बटर विक्रीच्या वादातून भावाला मारत होते तिघे, भांडण सोडवण्यास गेला आणि...
18 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता 12 वर्षांच्या सीतीला मृत घोषित करण्यात आलं. डॉ मोहम्मद सालेह यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीला मधुमेहाचा त्रास होता. या त्रासामुळे मुलीच्या शरीरातील एकएक अवयव काम करायचे बंद झाले. संध्याकाळी 7 वाजता हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ही 12 वर्षांची मृत मुलगी पुन्हा जिवंत झाली तिने आईसोबत गप्पाही मारल्या आणि तासाभरात पुन्हा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार पाहून घरातले लोकही चक्रावून गेले होते मात्र आपली मुलगी परत आल्याचा आनंद खूप मोठा असला तरी फार काळ टिकू शकला नाही.