हुबई, 21 ऑगस्ट : देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण मराठीमध्ये प्रचलित आहे. ज्याता साक्षात परमेश्वर वाचवू इच्छितात त्याला कोण मारणार. असाच प्रकार एका चार वर्षांच्या मुलाबाबत घडला. हा मुलगा 18व्या मजल्यावरून खिडकी खाली वाकून बघत असताना तोल जाऊन खाली पडला. आश्चर्य वाटेल पण हा मुलगा वाचला.
चीनच्या हुबेई प्रांतात झियान्यायांग येथे एक चार वर्षांचा मुलगा घरी एकटा होता. आई-वडिल घराबाहेर गेले असताना तो पलंगावर चढला आणि 180 फूट खाली पडला. ही घटना 6 ऑगस्ट रोजी घडली. डेली मेलच्या वृत्तानुसार, हा मुलगा खाली पडला खरा, मात्र तो झाडाच्या फांदीवर अडकल्यामुळे वाचला. मात्र यात तो गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्याची प्रकृती स्थिर आहे.
वाचा-बापरे! डॉक्टरांनी केलं मृत घोषित, दफन करण्याआधीच उठून बसली वृद्ध महिला
Boy, four, miraculously survives an 18-storey plunge after falling out of a window https://t.co/pBFSu8LCW7
— Daily Mail Online (@MailOnline) August 19, 2020
वाचा-...आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL
गंभीर जखमी झालेला हा मुलगा घरी आपल्या आजीबरोबर राहतो, कारण त्याचे पालक दुसर्यास शहरात काम करतात. घरी एकटाच खेळत असताना टेबलावर चढून तो खिडकीतून खाली वाकून पाहत असातान त्याचा तोल गेला. हा प्रकार घडला तेव्हा मुलाची आजी सामना आणण्यासाठी बाहेर गेली होती.
वाचा-पावसामुळे रस्ता धजला अन् जमिनीखाली गाडल्या गेल्या 21 गाड्या, पाहा VIDEO
मुलगा 180 फूटांवरून खाली पडल्यानंतर त्याच्या पालकांना इमरजन्सी सर्व्हिसकडून फोन आला. मुलाच्या वडिलांनी सांगितले की, लहान बाळाच्या आजीला धक्का बसला. काही अनोळखी लोकांनी मुलाल झाड़ावरून खाली उतरवले आणि त्याला रुग्णालयात दाखल केले.
4 वर्षांच्या या चिमुरड्याला अनेक ठिकाणी गंभीर जखम झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. सध्या मुलाला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. मुलावर उपचार करणारे डॉ चेन इलेव्हन म्हणाले की, या मुलाचा जीव वाचला हे एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाही आहे.