महिलेनं दिवसाढवळ्या तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद

महिलेनं दिवसाढवळ्या तरुणीला मारहाण करत हिसकावला मोबाईल, घटनेचा VIDEO कॅमेऱ्यात कैद

व्हिडिओमध्ये (Video) पाहायला मिळतं, की एक महिला रस्त्यावर चालणाऱ्या दुसऱ्या महिलेचा मोबाईल (Mobile) हिसकवण्याच्या प्रयत्न करते आणि या महिलेला मारहाणही करते.

  • Share this:

नवी दिल्ली 18 जून : सोशल मीडियावप सतत निरनिराळे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अनेकदा चोरी, लूट, हत्या, मारहाण असे गुन्हेदेखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) कैद होतात. अनेकदा लोक असे व्हिडिओ (Video) आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करतात आणि सोशल मीडियावर (Social Media) शेअर करतात. यामुळे, आरोपींचा शोध लावणंही काही प्रमाणात सोपं होतं. असाच एक व्हिडिओ दिल्लीच्या (Delhi) सुल्तानपुरीमधून समोर आला आहे. यामध्ये एक महिला रस्त्यावर चालणाऱ्या दुसऱ्या महिलेचा मोबाईल (Mobile) हिसकवण्याच्या प्रयत्न करते आणि या महिलेला मारहाणही करते.

VIDEO: कोल्हापुरात पावसाचं धुमशान, जाणून घ्या पावसाचे लेटेस्ट अपडेट्स

दिल्लीत पहिल्यांदाच एका महिला स्नॅचरचा असा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मोबाईल स्नॅचिंगची ही घटना दिल्लीच्या सुल्तानपुरीमध्ये घडली आहे. व्हिडिओमध्ये पाहायला मिळत, की एक मुलगी मोबाईलवर बोलत रस्त्यावरुन चालत आहे, इतक्यात दुसरी महिला मागून येते, या तरुणीला मारहाण करते आणि तिचा मोबाईल घेऊन फरार होते. बहुतेकदा सोनसाखळी चोर हे गाडीवर येतात, जेणेकरुन त्याठिकाणाहून लवकर पळ काढता यावा. मात्र, ही महिला मोबाईल हिसकावून पायीच तिथून पळ काढते. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीची घटना तिथेच असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

सामान्यांना मोठा दिलासा! खाद्यतेलांच्या किंमती उतरण्यास सुरुवात

या घटनेनंतर सुल्तानपुरी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांना अशी माहिती मिळाली आहे, की या महिलेचं नाव ज्योती आहे. ही महिला मंगोलपुरी परिसराती रहिवासी आहे. पोलिसांनी ज्योतीला चोरलेल्या मोबाईलसह अटक केली आहे. तर, ज्या मुलीचा मोबाईल चोरला गेला होता, तिचं नावदेखील ज्योतीच आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आसपासच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दिवसाढवळ्या झालेली ही चोरीची घटना पाहून लोकही हैराण आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: June 18, 2021, 7:45 AM IST

ताज्या बातम्या