मुंबई : आपण अनेकदा कोणतीही वस्तू विकत घ्यायची झाली की त्याला ऑनलाईन पाहातो आणि बाजार भावापेक्षा स्वस्त आापल्याला ती मिळाली तर आपण लगेच बुक करुन टाकतो. वस्तूंवर डिस्काउंट घ्यायला कोणाला आवडत नाही. कमी पैशात आपल्याला एखादी वस्तू मिळण्याचं सुख काही वेगळंच असतं. तसेच फ्री डिलिव्हरीची बातच काही वेगळी आहे. म्हणून बऱ्याचदा लोक वेगवेगळ्या ऑनलाईन साईटवर त्या वस्तूंची किंमत पाहातात आणि विकत घेतात. तसेच फ्री डिलिव्हरी आहे की नाही ते पाहातात, पण विचार करा की हे डिस्काउंट घेणं तुम्हाला महागात पडलं तर? साधं सूधं महागात नाही बरं का लाख रुपयांनी महागात… ही घटना एका महिलेसोबत घडली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? चला समजून घेऊ. 96 वर्षाच्या महिलेचं घर विकत घेताच, व्यक्तीला बसला धक्का, नक्की हा प्रकार काय? एका कंपनीच्या डिलिव्हरी बॉयने सामानाची डिलिव्हरी करण्यासाठी एका महिलेकडून डिलिव्हरी चार्ज म्हणून 50 रुपये घेतले. महिलेने त्याला पैसे दिले आणि तो निघून गेला. महिलेने त्या कंपनीची वेबसाईट तपासली आणि त्यात फ्री डिलिव्हरी असे लिहिले होते. महिलेने गुगलच्या मदतीने त्या कंपनीचा नंबर काढला. या व्यक्तीने कंपनीचा प्रतिनिधी म्हणून ५० रुपये परत करण्याच्या बहाण्याने पीडितेच्या खात्यातून एक लाख रुपये काढले. पीडित सुषमाच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशनच्या सायबर सेलने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, सामान घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयने तिला सांगितले की डिलिव्हरी चार्जसाठी 50 रुपये वेगळे द्यावे लागतील. त्यावेळी पीडितेने त्याला पैसे दिले आणि डिलिव्हरी बॉय निघून गेला. काही वेळानंतर पीडितेला वाटले की तिने 50 रुपये द्यायला नाही हवे होते कारण तिला डिलिव्हरी फ्री होती. त्यानंतर या महिलेनं गुगलवरून कंपनीचा नंबर शोधला, त्या नंबरवर फोन केल्यावर एका तरुणाने कॉल उचलला आणि स्वतःला कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले.
ऍनी डेस्क ऍपद्वारे अडकवले या तरुणाने पिडितेला सांगितले की डिलिव्हरी बॉयने तिच्याकडून चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले आहेत आणि तो रक्कम परत करेल. त्याने पीडितेच्या फोनमध्ये ऍनी डेस्क नावाचे ऍप डाउनलोड करायला लावले. त्याने पीडितेला आपल्या जाळ्यात अडकवून त्या ऍपचा आयडी शोधून काढला. काही वेळात तिच्या खात्यात 50 रुपये पोहोचतील, तिला सांगितले बराच वेळ होऊनही पैसे न आल्याने पीडितेने तिचा मोबाइल पाहिला. तेव्हा मात्र तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. या महिलेच्या बँकेतून एक लाख रुपये काढल्याचा मेसेज तिच्या मोबाईलवर आला होता, जे पाहून तिला धक्काच बसला. पीडितेने ती ज्या नंबरवर बोलत होती, त्या नंबरवर पुन्हा कॉल केला असता, फोन बंद आला. त्यानंतर पीडितेने या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली.

)







