मुंबई : जर तुम्ही एखाद्या वस्तूसाठी इन्वेस्ट केलात आणि तुम्ही अपेक्षा केलेली असेल आणि त्यापेक्षा काही वेगळं घडलं तर? म्हणजे जर हा बदल चांगला असेल तर काही फरक पडत नाही. पण जर अपेक्षेपेक्षा काही कमी मिळालं तर मात्र माणसाला दु:ख होतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत घडलं, या व्यक्तीने 96 वर्षाच्या महिलेचं घर विकत घेतलं, त्याला हे घरं बाहेरुन अगदी साधं वाटलं होतं. पण आत जाताच त्याला धक्का बसला. अखेर 20 वर्षानंतर उलगडलं एलियनच्या सांगाड्याचं रहस्य, नक्की हा प्रकार काय? तुम्हाला आता नक्कीच असा प्रश्न पडला असेल की नक्की असं काय होतं त्या घरात? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 72 वर्षांपूर्वी हे घर एका महिलेने बांधले आणि सजवले होते जे आता तिने विकण्यास काढले आहे. तिने नेहमीच तिच्या घराची खूप चांगली काळजी घेतली आहे आणि तिला तिचे घर खूप आवडते. पण आता तिच्यासाठी हे इतके लाजिरवाणे आहे आता ती यापुढे स्वतःची आणि तिच्या घराची काळजी घेऊ शकत नाही ज्यामुळे तिने हे घर विकण्याचा विचार केला. रिअल इस्टेट ब्रोकर जेव्हा हे घर पाहायला आला तेव्हा त्याला धक्का बसला. हे घर फारच अप्रतिम दिसत होते. हे जवळजवळ एखाद्या राजघराण्यासारखंच हे घर असल्यासारखं वाटत होतं. बाहेरून हे घर साधं दिसत आहे. पण त्याचा आत जाताच ते घर राडवाड्यापेक्षा कमी नाही.
उंबरठ्यावरून पाऊल टाकताच एका वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटतं. हे चमकदार आलिशान आणि खरोखर छान विंटेज फर्निचरने भरलेले आहे, ज्याची आत्तापर्यंत फारच चांगली काळजी घेतली गेली आहे. कुठेही धूळ किंवा डाग नाही. हे स्पष्ट आहे की या महिलेला तिच्या सर्व वस्तूंवर खरोखर प्रेम होतं.
काही खोल्या अतिशय स्वच्छ आणि स्टायलिश रेट्रो आहेत, तर काही खोल्या जुन्या आहेत.
तळघरात तुम्हाला कंट्री स्टाइल बार आणि लाउंज रूम मिळेल. दिवसभराच्या मेहनतीनंतर आराम करण्यासाठी हे फारच योग्य ठिकाण आहे. या महिलेला गुलाबी रंग फार आवडायचा, त्यामुळे जवळजवळ प्रत्येक खोलीत तुम्हाला गुलाबी अॅक्सेंट किंवा वॉलपेपर सापडतील ज्यामुळे तुम्हाला हे घर एखाद्या परीकथेतले आहे असे वाटेल.

)







