हिना आझमी, प्रतिनिधी डेहराडून, 22 जून : उत्तराखंडचं सौंदर्य पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात, गर्द झाडीत रमण्याचा आनंद घेतात. परंतु आता हे सौंदर्य आणखी वाढवण्याच्या हेतूने येथील झाडं तोडण्याचं प्रमाण अधिक वाढलं आहे. राजधानी देहरादूनमध्ये सुरू असलेली ही वृक्षतोड थांबवण्यासाठी पर्यावरणप्रेमी पुढे आले आहेत. एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर तिला श्रद्धांजली वाहिली जाते, त्याचप्रमाणे येथील लोक तोडलेल्या झाडांना श्रद्धांजली देऊ लागले आहेत. आपण लहान बाळासारखी वाढवलेली झाडं डोळ्यासमोर छाटली जात असताना त्यांना प्रचंड वेदना होतात. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या फोटोला हार घालून जशी फुलं वाहिली जातात तशीच झाडाचा फोटो लावून त्याला हार घालून याठिकाणी वृक्षतोडीला विरोध केला जात आहे. ‘सिटीजन्स ऑफ ग्रीन दून’ या दून व्हॅलीतील पर्यावरणप्रेमी पथकाच्या साथीने स्थानिकांकडून हे आंदोलन केलं जात आहे.
ही झाडं आम्ही लावलेली आहेत. आम्ही त्यांचा मुलांसारखा सांभाळ केला आहे. त्यांना स्वतः पाणी दिलं आणि आता ती अशी मुळासकट नष्ट होताना पाहून खूप दुःख होतं. या वृक्षतोडीमुळे देहरादून भकास होत चाललंय, अशा भावना येथील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. हायवेपासून किती अंतरावर असावं घर? फॉलो केला नाही नियम तर सापडू शकता अडचणीत पर्यावरणप्रेमी हिमांशू अरोरा यांनी वृक्षतोडीबाबत संताप व्यक्त करत म्हटलं, ‘स्मार्ट सिटी बनवण्याच्या नावाखाली देहरादूनमध्ये सतत वृक्षतोड केली जातेय. सुरुवातीला सहस्त्रधारा मार्गावरील झाडं तोडली, त्यानंतर आता प्रत्येक भागातली झाडं तोडण्यात येत आहेत. काही दिवसांपूर्वीच चकराता रस्त्यावरील जवळपास 16 जुनी झाडं तोडण्यात आली. याबाबत जाब विचारला असता, झाडं पुन्हा लावली जातील, असं सांगून सामान्य जनतेला शांत केलं जातय’, असं त्यांनी सांगितलं.