जंगलात जिवंत राहण्यासाठी एका प्राण्याला दुसऱ्या प्राण्याची शिकार करावीच लागते. यात बऱ्याचवेळा रोमांचक तर कधी कधी भयंकर शिकार होते. जंगलातील असाच एक भयंकर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तुम्ही अजगराला अनेक वेळा शिकार करताना पाहिले असेल, पण एका क्षणात अजगरानं हरणाची केलेली शिकार विरळ आहे. मात्र असाच प्रकार महाराष्ट्रात घडला. ही घटना महाराष्ट्रातील Central Chanda Division, Maharashtra असल्याचं बोललं जात आहे. एका तलावाच्या किनारी हरिण पाणी पित असल्याचं व्हिडिओत दिसतंय. या तलावात एक मोठा अजगर लपून राहिला होता, हरणानं पाणी पिण्यास सुरुवात केल्यानंतर अजगर पाण्याचा बाहेर आला आणि त्यानं हरणावर हल्ला केला. हरिण आणि अजगर यांच्यात फक्त 50 मिलीसेकंदाची लढत झाली, डोळ्यांच्या पापण्या मिटण्याच्या आतच अजगरानं हरिणाची शिकार केली. अजगर-हरणाचा हा व्हिडिओ इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचे अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. वाचा- आयडियाची कल्पना! रस्ता क्रॉस करण्यासाठी हत्तीचा अजब जुगाड, VIDEO VIRAL हा व्हिडीओ 21 नोव्हेंबरला शेअर करण्यात आला. आतापर्यंत 17 हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. यावर एका युझरनं खतरनाक शिकार, खतरनाक मरण! अशी कमेंट केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाचा- आम्ही काय गोट्या खेळायला बसलो होतो का? संजय राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले
One of the clip from E surveillance Video of Central Chanda Division from Maharashtra. When pythons kill prey, they use a kind of ambush technique by jumping & striking the prey, grabbing it with their teeth in around 50 milliseconds only. ( Humans take 200ms to blink an eye). pic.twitter.com/e0jPrz1hVx
— Susanta Nanda (@susantananda3) November 21, 2019
वाचा- रणवीर सिंहचा ड्रेस घालून फसली बॉलिवूड अभिनेत्री, नेटकरी म्हणाले… काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारची आणखी एक घटना समोर आली होती. अजगर झाडाच्या पाठी लपला होता, बिबट्या जवळ येताच अजगराने बिबट्यावर हल्ला केला होता. काही वेळ सुरु असलेल्या झटापटीनंतर बिबट्याने अजगरावर मात करत त्यालाच भक्ष्य केलं होतं. हा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

)







