मुंबई, 04 जुलै : आपल्यापैकी जवळ-जवळ प्रत्येकाने रेल्वेनं प्रवास केलाच असेल. रेल्वे हे एका भागाला दुसऱ्या भागाशी जोडण्याचं काम करते. ज्यामुळे आपल्याला कोणत्या ही भागात किंवा राज्यात जाणं सोप्पं होतं. काही रेल्वे मार्ग तर एका देशातून आपल्याला दुसऱ्या देशात देखील नेतात. रेल्वेचा प्रवास सुखकर आणि आरामदायी असतो. रेल्वेला आणि रेल्वे मार्गांना काही नावं देण्यात आली आहेत, ज्यामुळे प्रवास करणं सोप्पं जातं. परंतू तुम्हाला माहितीय का की जगात अशी एक रेल्वे आहे तिला ‘डेथ रेल्वे’ नावाने ओळखलं जातं. यामागचं कारण इतिहासात लपलंय. इथलं पाणी प्यायल्यानं होतो मृत्यू; जगातील सर्वात धोकादायक सरोवराचं रहस्य माहितीय का? हा रेल्वे मार्ग बनताना इथे एक लाखाहून अधिक लोकांना मृत्यू झाला आहे. ज्यामुळे त्याला असं नाव देण्यात आलं. नक्की काय घडलं? 1942 मध्ये जपान ने थाईलंड आणि बर्माला जोडण्याचं काम सुरु केलं होतं. त्यासाठी त्यांनी रेल्वे लाईनचा पर्याय निवडला आणि काम सुरु देखील केलं. परंतू जेव्हा या रेल्वे लाईनचं काम सुरु होतं, तेव्हा जपानच्या सैनिकांनी मजूरांशी क्रूर व्यवहार करायला सुरुवात केली. कोणत्या गोष्टींची सुविधा न पुरवल्या गेल्यामुळे मलेरिया, भुखमरी, थकावट आणि इतर काही गंभीर आजांरामुळे रेल्वे मजूरांचे प्राण गेले.
जर मेलेल्या मजूरांचा एकूण आकडा काढला तर तो एक लाखाच्याही वर जातो आणि याच कारणामुळे या भागात धावणाऱ्या रेल्वेला डेथ रिवर म्हणून ओळखलं जातं.

)







