या सरोवरातून पहाटेच्या वेळी ड्रम वाजवल्याचा आवाज येतो, असं लोकांचं म्हणणं आहे. तसंच माणसांच्या आणि प्राण्यांच्या ओरडण्याचाही आवाज येतो. डोंगरावर राहणारा एक महाकाय अजगर या सरोवराचं रक्षण करतो असं स्थानिकांना वाटतं. त्या अजगराला प्रसन्न करण्यासाठी वेंदा आदिवासी दरवर्षी एक नृत्य उत्सव आयोजित करतात. या उत्सवात लग्न न झालेल्या मुली नृत्य करतात.
प्राचीनकाळात भूस्खलन झाल्यानं मुटाली नदीचा प्रवाह थांबला व त्यामुळे हे सरोवर तयार झालं असं सांगितलं जातं. या सरोवराचं पाणी एकदम स्वच्छ असूनही ते प्यायल्यानं लोकांचा मृत्यू का होतो, यामागचं गूढ अजून उकललेलं नाही.
सरोवराचं रहस्य शोधण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. मात्र दरवेळी तो फसला. 1946 मध्ये अँडी लेविन नावाचा माणूस रहस्य शोधण्यासाठी तिथे आला होता. त्यानं थोडं पाणी व काही झाडं सोबत घेतली. मात्र परत जाताना तो वाट चुकला. त्याच्याबाबत हे अनेकदा घडलं.
अँडी लेविनं जेव्हा त्याच्याकडची झाडं व पाणी फेकून दिलं तेव्हाच त्याला रस्ता सापडला. मात्र त्यानंतर एकाच आठवड्यात तो मरण पावला. त्यामुळे या सरोवराचं रहस्य अजून कोणीही शोधू शकलेलं नाही. या सरोवरातून होणारं विषारी वायूचं उत्सर्जन हेच त्या सरोवराच्या विषारी पाण्याचं कारण असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. मात्र त्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत.