मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Dead man alive : बापरे! रात्रभर फ्रिजरमध्ये ठेवलेला मृतदेह बाहेर काढताच हलू लागला, डॉक्टरांनाही फुटला घाम; Shocking video viral

Dead man alive : बापरे! रात्रभर फ्रिजरमध्ये ठेवलेला मृतदेह बाहेर काढताच हलू लागला, डॉक्टरांनाही फुटला घाम; Shocking video viral

मृत घोषित केलेली ही व्यक्ती तब्बल सात तास फ्रिजरमध्ये होती.

मृत घोषित केलेली ही व्यक्ती तब्बल सात तास फ्रिजरमध्ये होती.

मृत घोषित केलेली ही व्यक्ती तब्बल सात तास फ्रिजरमध्ये होती.

  • Published by:  Priya Lad

लखनऊ, 22 नोव्हेंबर : मृतदेहाची (Deadbody) हालचाल होणं, त्याचे हात हलणं, त्याने डोळे उघडणं किंवा पूर्ण मृतदेहच ताडकन उठून बसणं (Dead man alive)... बऱ्याचदा हॉरर फिल्म किंवा सीरिअलमध्ये तुम्ही असा सीन पाहिलाच असेल. तो ऑनस्क्रिन पाहूनही तुम्हाला घामही फुटला असेल. मग विचार करा, जर प्रत्यक्षात असं घडलं तर... काय फक्त कल्पना करूनच तुमचं शरीर गार पडलं ना? अशी घटना वास्तवात घडली आहे ती उत्तर प्रदेशात (Uttar pradesh dead man alive).

रात्रभर शवगृहाच्या फ्रिजरमध्ये ठेवलेल्या मृतदेहाची सकाळी अचानक हालचाल होऊ लागली (Uttar pradesh dead man alive after kept 7 hours in freezer). ते पाहून डॉक्टरांनाही घाम फुटला. तब्बल सात तास मृतदेह फ्रिजरमध्ये होता. मृत घोषित करून फ्रिजरमध्ये ठेवल्याच्या सात तासांनंतरही ती व्यक्ती जिवंत होती.

रिपोर्टनुसार, श्रीकेश कुमार नावाची ही व्यक्ती. या व्यक्तीचा अपघात झाला होता. एका वेगवगान गाडीने श्रीकेशला टक्कर दिली. गेल्या गुरुवारी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

हे वाचा - Shocking Video! स्मोकिंग करताना चेहराच पेटला; ऐटीत धूर सोडण्याची हौस पडली महागात

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी श्रीकेशचा मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवला. रात्रभर तब्बल सात तास मृतदेह फ्रिजरमध्येच होता. मृतदेह कुटुंबाला देण्यासाठी म्हणून सात तासांनंतर सकाळी फ्रिजरमधून बाहेर काढण्यात आला तेव्हा मृतदेहामध्ये हालचाल होऊ लागली. जे पाहून डॉक्टरही हैराण झाले. डॉक्टरांनी मृतदेहाची तपासणी केली तेव्हा ती व्यक्ती जिवंत असल्याचं स्पष्ट झालं. त्या व्यक्तीला पुन्हा रुग्णालायत दाखल करण्यात आलं आणि आता त्याची प्रकृती सुधारत असल्याचीही माहिती मिळते आहे.

हे वाचा - सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी भरधाव रेल्वेसमोर केलं शूट; मृत्यूचा महाभयंकर VIDEO

मुरादाबादचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिव सिंह यांनी सांगितलं की, आपात्कालीन डॉक्टरांनी रात्री तीन वाजता जेव्हा रुग्णाला तपासलं तेव्हा त्याच्या हृदयाची धडधड बंद झाली होती. त्यांनी खूप वेळा त्याची तपासणी केली. सर्व तपासण्या झाल्यानंतरच त्या व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणात तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.

First published:

Tags: Dead body, Shocking viral video, Uttar pradesh, Viral, Viral videos