मराठी बातम्या /बातम्या /Viral /सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी भरधाव रेल्वेसमोर केलं शूट; मृत्यूचा महाभयंकर VIDEO

सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी भरधाव रेल्वेसमोर केलं शूट; मृत्यूचा महाभयंकर VIDEO

संजूचा मित्र मोबाइलवरुन त्याचा व्हिडीओ शूट करीत होता.

संजूचा मित्र मोबाइलवरुन त्याचा व्हिडीओ शूट करीत होता.

संजूचा मित्र मोबाइलवरुन त्याचा व्हिडीओ शूट करीत होता.

भोपाळ, 22 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) होशंगाबादमध्ये रेल्वे ट्रॅकवर व्हिडीओ (Video Viral On Social Media) करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला जलद गतीने येणाऱ्या मालगाडीने धडक दिली. यामुळे तरुण लांब जाऊन पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यानंतर तातडीने त्याला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तरुणाचा मृत्यू झाला. (Railway Accident)

तरुणाने केलेला हा स्टंट आणि त्याच्या मृत्यूचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ही घटना होशंगाबादमधील पथरोटा पोलीस ठाणे हद्दीतील आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी नागेश वर्मा यांनी सांगितलं की, संजू चौरे नावाचा तरुण रविवारी सायंकाळी आपल्या अल्पवयीन मित्रासह बैतूल रोडवरील शऱददेव बाबा रेल्वे पुलाजवळ गेला होता. (Standing in front of the train shooting video from mobile Horrible VIDEO of death)

सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी तो रेल्वे ट्रॅकजवळील व्हिडीओ शूट करीत होता. यादरम्यान एक मालगाडी रेल्वे ट्रॅकजवळ आली. मालगाडी इतक्या जलद गतीने येत होती, की, संजूला तेथून स्वत:चा जीव वाचवण्याचा वेळही मिळाला नाही. मालगाडीच्या धडकेमुळे तो लांब फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याला इटारसीच्या सिव्हील रुग्णालयात नेण्यात आलं, येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. पोलिसांनी सांगितलं की, व्हिडीओ घेत असताना निष्काळजीपणाही ही घटना घडल्याची शक्यता आहे.

व्हि़डीओ झाला व्हायरल..

रविवारी सायंकाळी झालेल्या अपघाताचा हा व्हिडीओ संजूच्या मित्राच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. आता हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

First published:

Tags: Crime news, Railway accident, Shocking accident, Shocking news, Shocking video viral