मुंबई, 26 जुलै : बहुतांश सासू आणि सून यांच्यात दररोज भांडणे होत असतात. त्यांच्यातील भांडण जगप्रसिद्ध आहे. घरातील एखाद्या छोट्या कारणामुळे भांडणं होणं तसं कॉमन झालं आहे. परंतू शाब्दीक वाद भांडणात बदललेला फारच कमी वेळा पाहायला मिळतो. यासंबंधीत काही व्हिडीओ देखील तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतली. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. हा व्हिडीओ अलीगढचा असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये स्वयंपाकघरात सासू-सून यांच्यात भांडण झाले आहे. सासू सुनेला रोज मारहाण करत असल्याचा आरोप केला जात आहे. ‘सर लोन पाहिजे का?’ असं विचारताच, व्यक्तीनं मागितली अशी गोष्ट ऐकून थेट कोमात गेली तरुणी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये किचनमध्ये सासू आणि सूनेचं डोक जमीनीवर आदळताना दिसत आहे. आधी दोघांमध्ये कोणत्यातरी मुद्द्यावरून वाद होतो आणि नंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचते. तेव्हा बचावात सूनही सासूपासून स्वत:चं रक्षण करताना दिसत आहे. भांडणानंतर सासू आणखीनच रागावलेली दिसते आणि सुनेला काहीतरी बोलताना दिसते. यादरम्यान घटनास्थळी एक मुलगी देखील हजर आहे जी दोघांमधील भांडण पाहून रडताना दिसतेय.
तीन मुलींना सुनेनं जन्म दिला, नातू हवा म्हणून सासू रोज करते छळ, मारामारीचा व्हिडीओ समोर#viral #VideoViral #socialmedia pic.twitter.com/wqK00GRH8p
— News18Lokmat (@News18lokmat) July 26, 2023
सासूला मुलगा हवा होता, पण सुनेने तीन मुलींना जन्म दिला ज्यामुळे हा प्रकार घडला असल्याचं सुत्रांनी माहिती दिली आहे. या कारणावरून सासू-सासरे रोज भांडण करतात. मात्र, याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे लेखी तक्रार देण्यात आलेली नाही. व्हायरल झालेला व्हिडीओ काही दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. हे प्रकरण अलीगढमधील गांधी वॉर्ड पोलीस स्टेशन परिसरातील डोरी नगरशी संबंधित आहे. या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यासोबतच यावर यूजर्सच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत.

)







