जाहिरात
मराठी बातम्या / Viral / आता हेच बाकी होतं! लोकांना त्यांचा परफेक्ट मॅच मिळवून देण्यासाठी DATING SITE ची थेट देवासोबत पार्टनरशिप

आता हेच बाकी होतं! लोकांना त्यांचा परफेक्ट मॅच मिळवून देण्यासाठी DATING SITE ची थेट देवासोबत पार्टनरशिप

आता हेच बाकी होतं! लोकांना त्यांचा परफेक्ट मॅच मिळवून देण्यासाठी DATING SITE ची थेट देवासोबत पार्टनरशिप

टिंडर साइटने थायलंडमधील त्रिमूर्ती म्हणजे ;थाई गॉड ऑफ लव्ह’सोबत पार्टनरशिप केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बँकॉक, 04 मार्च : देव जोड्या स्वर्गातच बनवतो, धरतीवर फक्त योग्य मॅच भेटण्याची प्रतीक्षा करावी लागते, असं म्हटलं जातं. पण याला डेटिंग साइटने सीरिअसली घेतलं आहे. स्वर्गात जमवलेल्या या परफेक्ट जोड्या धरतीवर मिळवण्यासाठी त्यांनी थेट देवाशीच पार्टनरशिप केली आहे (Dating Site Collabs With God). याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेच. थायलंडमध्ये टिंडरने (Dating Site Tinder Thailand) ने लोकांना त्यांचा परफेक्ट लाइफ पार्टनर मिळवून देण्यासाठी हटके मार्ग शोधला आहे. बँकॉकच्या सेंट्रल वर्ल्ड मॉलसमोरील मंदिराजवळ टिंडरने आपले पोस्टर्स लावले आहेत आणि लोकांना देवासमोर अॅपवर आपला मॅच शोधण्यास सांगितलं आहे. यासाठी टिंडरने त्रिमूर्तीसोबत (थाई गॉड ऑफ लव्ह) पार्टनरशिप केली आहे. हे वाचा -  पेट्रोलवाली लव्हस्टोरी! फक्त Petrol साठी नवरीबाई लग्नाच्या बोहल्यावर चढली लोकांना मंदिरासमोर जाऊन अॅपचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो आहे.  मंदिरासमोर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर लेट्स मॅच. प्रार्थना करून राइट स्वीप करा, असं सांगितलं आहे. असं केल्याने खरं प्रेम मिळण्याची शक्यता वाढते, हे लॉजिक त्यांनी यामागे दिलं आहे. यामुळे देवाच्या मर्जीनुसार तुम्हाला तुमचा परफेक्ट लाइफ पार्टनर सहजरित्या भेटेल असा दावा करण्यात आला आहे. देवासोबतच्या या पार्टनरशिपचा टिंडरला खूप फायदा होतो आहे. बरेच अविवाहित तरुण-तरुणी मंदिरासमोर आपला लाइफ पार्टनर शोधायला येत आहेत. अॅपच्या वापरातही वाझही झाली आहे. स्थानिक मीडियानुसार आपलं प्रेम मिळावं यासाठी लोक मंदिरात लाल गुलाब घेऊन येत आहेत. हे वाचा -  शिक्षक असावा तर असा! होमवर्क न करणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थिनीला ‘गोड शिक्षा’ होटल्स डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार, थायलँडमध्ये आलेले परदेशी पर्यटकांना या अॅपच्या माध्यमातून त्यांचं खरं मिळतं. काही लोक तर आपला संसारही सुरू करतात. या पार्टनरशिपमुळे मंदिरात लोकांची गर्दी होते आणि मंदिरात दानही भरपूर येतं. या पार्टनरशिपमुळें टिंडर आणि मंदिर दोघांनाही फायदा होतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात