जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Video : डझनभर मगरींनी तरुणाला घेरलं, जीव वाचवण्याचा संघर्ष कॅमेरात कैद

Video : डझनभर मगरींनी तरुणाला घेरलं, जीव वाचवण्याचा संघर्ष कॅमेरात कैद

व्हायरल व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओ

डझनभर मगरींमध्ये अडकला तरुण, जीव वाचवण्यासाठी शिडीवर तर चढला पण… Video Viral

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 15 फेब्रुवारी : जंगलातील सगळेच शिकारी प्राणी हे माणसांसाठी धोकादायक असतात. कारण ते आपल्या पोटाची भुक भागवण्यासाठी प्राण्यांचाच नाही तर माणसांचा देखील शिकार करु शकतात. पण जंगली प्राणीच नाही तर मगरीपासून देखील माणसाला धोका आहे. जसा सिंह जंगलातील राजा आहे, तशीच मगर देखील पाण्यातील राजा आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अशातच या धोकादायक मगरीसंबंधी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमच्या पोटात गोळा नक्कीच येईल, हो कारण या व्हिडीओत डजनभर मगरींमध्ये एक व्यक्ती अडकली आहे. हे ही पाहा : जगातील असं ठिकाण जेथे महिला टांगतात आपल्या शरीराचा ‘हा’ भाग आता विचार करा आपण नुसती एक मगर पाहिली तरी आपल्या पोटात गोळा येतो, मग इथे तर या व्यक्तीच्या मागे इतक्या मगर लागल्या आहेत, तर विचार करा त्याची काय अवस्था झाली असेल. सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती शिडीवर चढलेला दिसत आहे, तसेच त्याला डझनभर मगरींनी वेढलं आहे. या मगरी त्या व्यक्तीपासून काही फूट अंतरावरच आहेत. ही व्यक्ती कशीबशी करु आपले प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात आहे. तो एका झाडाच्या आणि शिडीच्या सह्याने या मगरींमध्ये उभा आहे आणि आपले प्राण कसे वाचले जाईल, या प्रयत्नात आहे.

News18लोकमत
News18लोकमत

पण या व्हिडीओ पुढे काय घडलं हे कळलेलं नाही. हा व्हिडीओ काढत असलेल्या व्यक्तीने त्याला मदत केली का? हे देखील कळू शकलेलं नाही. काहींचं असं देखील म्हणणं आहे की हा व्हिडीओ मुद्दाम तयार केला गेला असावा. पण त्याचं सत्य काय आहे, हे समोर आलेलं नाही.

जाहिरात

ट्विटरवर @ViciousVideos नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, “ओह माय गॉड” आणि त्यासोबत हसणारा इमोजी देखील टाकला. सध्या या व्हिडिओला एक लाख ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर अनेकांनी त्यावर आपले कमेंट्स देखील शेअर केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात