मराठी बातम्या /बातम्या /Viral /

वय वाढलं पण जोश तरुणांसारखा! भररस्त्याच आजोबांची WWF; पाहा VIDEO

वय वाढलं पण जोश तरुणांसारखा! भररस्त्याच आजोबांची WWF; पाहा VIDEO

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 14 सप्टेंबर : वाढत्या वयानुसार शारीरिक आणि आरोग्याच्याही समस्या बळावतात. शरीर थकतं, नीट चालणंही होत नाही. अशात फायटिंग तर दूरचीच गोष्ट. पण तीन आजोबा मात्र भररस्त्यात चक्क फायटिंग (Fighting) करताना दिसले. त्यांचं वय वाढलं होतं, पण त्यांच्यातील जोश तरुणांसारखाच आहे (Old man fighting).

भररस्त्यात तीन वयस्कर वयक्ती आपसात भिडले. तिघंही एकमेकांवर भारी पडली (Fighting video). हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. व्हिडीओ पाहूनच थक्क व्हाल.

व्हिडीओत पाहू शकता सुरुवातीला दोन व्यक्ती आपसात भांडत असतात. एकमेकांना ढकलतात. इतक्यात तिसरी व्यक्ती तिथं येते आणि ती एका व्यक्तीला ढकलते. मग काय तिघांमध्ये फायटिंग सुरू होते.

हे वाचा - लग्नातच नवरीबाईला 'जोर का झटका'! नवरदेवाचं 'ते' कृत्य पाहून उडालीच; VIDEO VIRAL

आधी ते एकमेकांना ढकलत असतात. पण हळूहळू ही फायटिंग चांगलीच रंगते. तिघंही एकमेकांना जमिनीवर आपटतात आणि लाथाबुक्के मारू लागतात.  व्हिडीओ नीट पाहिला तर लक्षात येतं. यामध्ये तीन व्यक्ती लढत आहे, त्यापैकी दोघं सोबत आहेत. म्हणजे  दोघं मिळून तिसऱ्याविरोधात लढत आहेत.

हे वाचा - सलूनमध्ये दाढी करता करता हादरला तरुण, जागीच बेशुद्ध झाला; नेमकं काय घडलं पाहा

या वयातही या आजोबांचा जोश पाहून नेटिझन्सना आश्चर्यच वाटतं. खरंतर त्यांची ही फायटिंग पाहून अनेकांना WWE चीच आठवण झाली आहे. व्हिडीओ पाहून त्यावर बऱ्याच कमेंट येत आहेत.

First published:

Tags: Viral, Viral videos