मराठी बातम्या /बातम्या /Viral /कुत्र्यांसमोर नाचणाऱ्या 'बसंती'चा डान्स सुपरहिट; इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO

कुत्र्यांसमोर नाचणाऱ्या 'बसंती'चा डान्स सुपरहिट; इंटरनेटवर तुफान व्हायरल होतोय VIDEO

विशेष म्हणजे कुत्रेदेखील शांतपणे तरुणीचा डान्स पाहत उभे आहेत.

विशेष म्हणजे कुत्रेदेखील शांतपणे तरुणीचा डान्स पाहत उभे आहेत.

विशेष म्हणजे कुत्रेदेखील शांतपणे तरुणीचा डान्स पाहत उभे आहेत.

शोले चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग ज्यात धर्मेंद्र हेमा मालिनीला म्हणतो की, बसंती इन “कुत्तों के सामने मत नाचना”. हा डायलॉग तर लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना लक्षात आहे. या गाण्यावर अनेक मजेशीर व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी आपल्या ट्विटरवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी रस्त्यांवरील काही कुत्र्यांसमोर मजेशीर डान्स करताना दिसत आहे. कुत्रेदेखील डान्स प्रेमी आहेत वाटतं..

“बसंती कुत्तों के सामने..... बसंती कुत्तों के सामने नाचीं” कॅप्शनसह IPS रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये तरुणी रात्रीच्या वेळी कुत्र्यांमध्ये डान्स करताना दिसत आहे. कुत्रेदेखील शांतपणे तरुणीचा डान्स पाहत आहेत. बॅकग्राउंडमध्ये व्हिडीओसह “जब तक है जान मैं नाचूंगी” हा गाणं वाजत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओवर युजर्सदेखील मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं आहे की, आता गब्बर तर राहिला नाही, त्यामुळे बसंती हवं तर कुत्र्यांसमोर नाचली किंवा गायली तरी काही हरकत नाही. तर दुसऱ्या एकाने लिहिलं आहे की, कुत्र्यांनी तर डान्सचा पुरेपूर आनंद घेतला.

हे ही वाचा-मुनमुन दत्तानं केली चिखलानं अंघोळ; ‘मडबाथ’मुळे उडवली जातेय खिल्ली

ही तरुणी म्हणजेच बसंती कोण आहे आणि कुत्र्यांसमोर काय नाचतेय, याबद्दल व्हिडीओमध्ये काही देण्यात आलेलं नाही. 1975 मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर हिट फिल्म शोलेमधील एका सीनमध्ये जेव्हा गब्बर(अमजद खान) बसंतीची भूमिका साकारणाऱ्या हेमामालिनीला तिचा प्रियकर वीरूच्या जीवनाचा हवाला देतो आणि डाकुंसमोर नाचण्यास सांगतो. यावेली रशींने बांधलेला वीरू म्हणजेच धर्मेंद ओरडतात आणि म्हणतात... "बसंती इन इन कुत्तों के सामने मत नाचना.." चित्रपटाचा हा डॉयलॉग खूप प्रसिद्ध झाला होता.

First published:
top videos

    Tags: Dog, Viral video.