नवी दिल्ली 25 मार्च : सोशल मीडियावर दररोज नवरी आणि नवरदेवाचे शेकडो व्हिडिओ व्हायरल (Bride Groom Videos) होतात. काही व्हिडिओ असे असतात, जे एकदा पाहिल्यानंतरही मन भरत नाही आणि आपण वारंवार ते व्हिडिओ पाहात राहातो. लग्नाच्या दिवशी वधू आणि वर हे पाहुण्यांसाठी आकर्षणाचं केंद्र असतात. लोक त्यांना अधिक प्राधान्य देतात आणि त्यांचे शब्द लक्षपूर्वक ऐकतात तसंच त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष देतात. लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये अविस्मरणीय क्षण निर्माण करण्यासाठी अनेकदा नवरी आणि नवरदेव डान्सही करतात. सध्या अशाच एका लग्नातील व्हिडिओ व्हायरल (Wedding Video Viral) झाला आहे.
लहान भावाच्या प्रेमात पडली विधवा बहीण; घरच्यांसह गावकऱ्यांनीही विरोध करताच उचललं हे पाऊल
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की कशाप्रकारे नवरीबाई अगदी मग्न होऊन आपल्या नवरदेवासोबत डान्स करत आहे. अगदी आनंदात ती नाचत आहे. तर नवरदेवाच्या चेहऱ्यावरही आनंद स्पष्ट दिसत असून तोदेखील डान्स करताना दिसत आहे. नवरीबाईने ऑफ व्हाईट कलरचा लेहंगा घातला आहे. तर नवरदेव ब्लॅक अॅण्ड व्हाईट टॅक्सिडोमध्ये दिसतो.
View this post on Instagram
नवरी आणि नवरदेव डान्स करत असतानाच असं काही घडतं, जे पाहून नवरीही थक्क होते. हे जोडपं डान्स करत असतानाच तिथे नवरदेवाच्या सासूबाईची एन्ट्री होते. नवरदेवाची सासूबाई निळ्या रंगाच्या लेहंग्यात इथे पोहोचते आणि सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते. स्टेजवर येताच ती अतिशय सुंदर पद्धतीने नवरदेवासोबत डान्स करू लागते (Mother in Law's Dance with Groom). हे पाहून नवरी थक्क होते आणि तिचा चेहरा पाहाण्यासारखा होतो.
धक्कादायक! लिफ्टमध्ये मालकिणीसोबत...; पाळीव श्वानाचं भयंकर कृत्य CCTV मध्ये कैद
सोशल मीडियावर हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. इन्स्टाग्रामवर thebridesofindia नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत याला कॅप्शन देण्यात आलं, 'आम्ही काही मदत नाही करू शकत, मात्र खरंच खूप चांगला सीन पाहायला मिळाला.' या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bridegroom, Wedding video