महिलेच्या डान्सचा व्हिडिओ काही सेकंदांचा आहे, मात्र काही दिवसांतच तो 85 हजाराहून अधिकांनी लाईक केला आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की महिलेच्या डान्स मूव्ह्सने अखेर त्यांची कमाल दाखवली आहे. हा व्हिडिओ wedus.in नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून तो एका लग्नसोहळ्याचा आहे. एका ठिकाणी अनेक पाहुणे जमलेले दिसतात आणि सगळे गाणी वाजण्याची वाट पाहत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, निळ्या साडीतल्या काकू सगळ्यात जास्त उत्साही दिसल्या. Wedding Video: नवरी मुलगी घेत होती एन्ट्री, नवरा मुलगा मित्रांसोबत बिझी; वधूला आला राग अन्... केसांमध्ये गुलाबाची फुलं लावलेली ही महिला इतकी उत्सुक दिसत होती, जणू आता कोणी तिला डान्स करण्यास सांगितलं तर ती आजबाजूचं सगळं विसरून मनसोक्त नाचेल. पुढे घडलंही तसंत. नाचायला सांगायच्या आधीच महिलेला गाण्यांचा आवाज ऐकू आला आणि तिला राहावलं नाही. गाणं सुरू होताच महिलेनं आपल्या जबरदस्त डान्सने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. उपस्थित सगळेच महिलेचा डान्स पाहातच राहिले. काही सेकंदांच्या या डान्स व्हिडिओ इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. साडी नेसलेली असूनही महिलेनं इतका कमालीचा डान्स केला. अशात तिने जर साडीऐवजी एखादा कंफर्टेबल ड्रेस घातला असता तर कदाचित यापेक्षाही जबरदस्त डान्स केला असता. लोकांना हा डान्स व्हिडिओ इतका आवडला की व्हिडिओला 80-85 हजार लाईक्स मिळाले आणि कमेंट्समधूनही हजारो लोकांनी या महिलेचं कौतुक केलं.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Wedding video