जाहिरात
मराठी बातम्या / Viral / लग्नात नवरा नवरीसह वऱ्हाड्यांचे वाजले बारा; कॅमेरामॅननं केलेली कृती चर्चेत

लग्नात नवरा नवरीसह वऱ्हाड्यांचे वाजले बारा; कॅमेरामॅननं केलेली कृती चर्चेत

लग्न

लग्न

सध्या सोशल मीडियावर एका विवाहसोहळ्यावेळी घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 डिसेंबर :  सोशल मीडियावर आश्चर्यकारक घटना, दुर्घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही घटनांमध्ये जीवितहानी झाल्याचं दिसतं, तर काही घटना भीषण असूनही लोक आश्चर्यकारकरित्या बचावल्याचं आपण पाहतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ एका विवाह सोहळ्यातला आहे. सोहळा ऐन रंगात आलेला असताना, अचानक कार्यक्रमस्थळी पाहुण्यांच्या पायाखालची जमीन खचून भला मोठा खड्डा पडतो. यात सुदैवाने कोणालाही काही इजा होत नाही. पण या वेळी एक व्यक्ती सर्वांचच लक्ष वेधते असं या व्हिडओमध्ये दिसतं. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असून, अनेक नेटिझन्सने यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. या व्हिडिओत चित्रित झालेली नेमकी घटना काय आहे आणि घटनेवेळी कोण व्यक्ती लक्षवेधी ठरली या विषयी जाणून घेऊया. सध्या सोशल मीडियावर एका विवाहसोहळ्यावेळी घडलेल्या दुर्घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. खरं तर काही वेळा लग्न समारंभात अशा काही घटना घडतात ज्या लोकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतात. यापैकी काही घटना भयानक असतात.असाच एक अंगावर काटा आणणारा प्रसंग एका विवाह सोहळ्यादरम्यान घडला. हा व्हिडिओ पाहिल्यावर तुमच्याही पायाखालची वाळू नक्की सरकेल. पण दुर्घटनेदरम्यान सर्वाधिक चर्चेत राहिला तो एक कॅमेरामन. विवाह सोहळा ऐन रंगात आला असतानाच विवाहस्थळी असलेला डान्स फ्लोअर खचून कोसळला आणि त्यामुळे तयार झालेल्या भल्या मोठ्या खड्ड्यात वऱ्हाडी मंडळी पडली. हेही वाचा -  Gautami Patilचा लावणी कार्यक्रम पहिल्यांदा रद्द; का? कुठे? समोर आली माहिती

जाहिरात

अगदी क्षणार्धात ही घटना घडल्याने विवाहस्थळी काही काळ भीतीचं वातावरण होतं. पण या वेळी एक कॅमेरामन त्याचं काम अगदी चोखपणे करत असल्याचं या व्हिडिओत दिसतं. या व्हायरल झालेल्या व्हिडिओवर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. यात एक युजर कमेंट करताना लिहितो, ‘एवढी मोठी घटना घडूनही कॅमेरामन त्याचं कर्तव्य विसरला नाही. कॅमेरामन हा शेवटी कॅमेरामन असतो’, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरनं दिली आहे. अजून एक युजर कमेंट करताना लिहितो, ‘हा तर खतरों का खिलाडी निघाला’. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत, एक विवाह सोहळा सुरू आहे. सोहळ्यात आनंदाचं वातावरण आहे. विवाहस्थळी असलेल्या डान्स फ्लोअरवर अनेक लोक डान्स करत आहेत. मात्र हा डान्स फ्लोअर लोकांचा भार पेलू न शकल्याने खचतो आणि कोसळून त्या जागी भला मोठा खड्डा पडतो. तत्क्षणी या फ्लोअरवर नाचत असलेले लोक या खड्ड्यात पडतात. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा होत नाही. दुर्घटना घडूनही त्या ठिकाणी उपस्थित असलेला एक कॅमेरामन आपलं काम प्रामाणिकपणे करताना दिसत आहे. त्याची कार्यतत्परता पाहून लोकांना हसू आवरत नाही. कॅमेरामनचा प्रामाणिकपणा पाहून लोक त्याच्यावर प्रभावित झाल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओवर अनेक नेटिझन्सनं जबरदस्त कमेंट्स केल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात