नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा वाद वर्षभर चांगलीच रंगलेला पाहायला मिळाला. काही दिवसांआधीच गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी आणा अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीनंतर पहिल्यांदाच गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. पुढील दोन महिन्यांच्या कार्यक्रमांच्या सुपाऱ्या घेणाऱ्या गौतमीचा कार्यक्रमात पहिल्यांदा रद्द करण्यात आला आहे.
गौतमी पाटील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे गणेश जयंतीनिमित्त लावणी सादर करणार होती. या कार्यक्रमाची तिला सुपारी मिळाली होती. मात्र हा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय.
गौतमीच्या सांगलीतील कार्यक्रमात तूफान राडा झाला होता. ज्यात एका वृद्धाचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले.
गौतमीच्या आधीच्या कार्यक्रमांचा विचार करून निमगाव केतकीच्या ग्रामस्थांनी कार्यक्रमाला जागा देण्यासाठी नकार दिला आहे. सुरक्षेचं कारण देत गौतमीचा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय.
गौतमीची लावणी अश्लील असल्याचा आरोप करत तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. लावणीवर कायमस्वरुपी बंदी आणण्याची मागणी करताच गौतमीनं तिचं मतं मांडलं होतं.
गौतमी म्हणाली होती की, 'मागच्या वेळेस माझ्याकडून चूक झाली होती. पण त्यानंतर माझे सगळे कार्यक्रम व्यवस्थित सुरू आहेत'.
'माझं केवळ हेच म्हणणं आहे की, मी एक कलाकार आहे. मी कला चांगली सादर करतेय. मी अश्लील काही करत नाहीये'.
'एवढं सगळं छान सुरू असताना, कोणतीही चुक न करताना माझ्या कार्यक्रमांवर अशी बंदी घालणं याचं मला फार वाईट वाटतं', असं गौतमीनं म्हटलं होतं.