नवी दिल्ली 10 एप्रिल : तिबेटी धर्मगुरु दलाई लामा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. यात ते एका लहान मुलाच्या ओठांवर किस करताना दिसले. व्हिडिओमध्ये दिसतं, की ओठांवर किस केल्यानंतर ते या मुलाला आपली जीभ चोखण्यासही सांगतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ त्यावेळचा आहे, जेव्हा मुलगा त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर दलाई लामांबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चोरट्यांनी असं काय चोरलं की सर्पमित्र रडायलाच लागले?, पाहा VIDEO व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दलाई लामा अल्पवयीन मुलाला विचारताना ऐकू येत आहे की, ‘तू माझी जीभ चोखू शकतोस का?’ ट्विटर वापरकर्त्यांनी या व्हिडिओवर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हिडिओ शेअर करताना ट्विटर यूजर जोस्ट ब्रोकर्सने लिहिलं की, ‘दलाई लामा एका बौद्ध कार्यक्रमात एका भारतीय मुलाचं चुंबन घेत आहेत आणि त्याच्या जिभेला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘@DalaiLama’ यांना टॅग करत आणखी एक ट्विटर वापरकर्ता दीपिका पुष्कर नाथ यांनी लिहिलं की, हे अशोभनीय आहे आणि दलाई लामा यांच्या या वागणुकीचे कोणीही समर्थन करू नये. व्हिडीओमध्ये लहान मुलगा दलाई लामा यांच्याप्रती आदर व्यक्त करताना दिसत आहे. याचवेळी सुरुवातीला ते त्याच्या ओठांवर किस करताना दिसत आहेत. यानंतर काही वेळाने ते त्याला आपली जीभ चोखणार का? अशी विचारणा करत जीभ बाहेर काढतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याधीही वादग्रस्त विधानामुळे चर्चेत - यापूर्वी 2019 मध्ये दलाई लामा यांनी असं म्हणून वाद निर्माण केला होता, की जर त्यांची उत्तराधिकारी महिला असेल तर ती “आकर्षक” असावी. 2019 मध्ये धर्मशाला येथे नोबेल शांतता पारितोषिक विजेत्याच्या निर्वासनातून प्रसारित झालेल्या ब्रिटीश ब्रॉडकास्टरला दिलेल्या मुलाखतीत या टिप्पणीबद्दल जगभरातून त्यांच्यावर टीका झाली. नंतर त्यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागितली होती.