ललितेश कुशवाहा, प्रतिनिधी भरतपूर, 7 एप्रिल : आत्तापर्यंत तुम्ही रोख रक्कम, वाहने किंवा सोने-चांदी लुटण्याच्या घटना वाचल्या असतील. पण राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील कमन परिसरातून लुटमारीची एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेबाबत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भरतपूर याठिकाणी येथे दुचाकीस्वार तरुणांनी गावोगावी जाऊन सापाचा खेळ करणाऱ्या दोन सर्पमित्रांकडून दोन सर्पमित्रांना लुटले. त्यांच्याकडून पैसे, 2 साप घेऊन त्यांनी पोबारा केला. या घटनेनंतर दोन्ही भाऊ रडू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक जमा झाले. त्यानंतर त्या दोन्ही भावांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती लोकांना दिली. यानंतर लोकांच्या सूचनेवरून त्यांनी कामां पोलीस ठाण्यात साप लुटल्याचा गुन्हा दाखल केला. ही घटना या परिसरात चर्चेचा विषय ठरली.
उत्तर प्रदेशातील छाता पोलीस स्टेशनच्या भदावल गावात राहणारा सर्पप्रेमी विकास नाथ याने सांगितले की, तो आणि त्याचा भाऊ राजेश नाथ सकाळी कामांच्या जैन परिसरात घरोघरी साप दाखवून पैसे मागत होते. दरम्यान, दुचाकीवर आलेल्या 4 जणांनी त्यांना मारहाण करण्याची धमकी देत पेटीत ठेवलेले दोन्ही साप व पैशांची मागणी करून तेथून पळ काढला. हा दरोडा गुंडांनी केल्याचा अंदाज आहे. कारण देशातील गुंडांकडून देशातील विविध प्रांतात जाऊन सर्परत्नाच्या सहाय्याने भोळ्याभाबड्या जनतेची संपत्ती दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना घडतात.