मराठी बातम्या /बातम्या /Viral /

Crocodile fish : याला मगर म्हणायचं की मासा? जाळ्यात अडकला विचित्र जलचर

Crocodile fish : याला मगर म्हणायचं की मासा? जाळ्यात अडकला विचित्र जलचर

पाण्यात सापडलेल्या या जीवाचं तोंड मगरीसारखं आणि धड माशासारखं आहे (Crocodile head and fish body).

पाण्यात सापडलेल्या या जीवाचं तोंड मगरीसारखं आणि धड माशासारखं आहे (Crocodile head and fish body).

पाण्यात सापडलेल्या या जीवाचं तोंड मगरीसारखं आणि धड माशासारखं आहे (Crocodile head and fish body).

    रांची, 20 ऑक्टोबर : प्रत्येक प्राण्याची (Animal) एक विशिष्ट रचना असते. त्या रचनेवरूनच त्या प्राण्याला ओळखलं जातं. पण सध्या एका अशा प्राण्याची चर्चा आहे, ज्याला नेमकं काय म्हणावं तेच समजत नाही आहे. झारखंडमध्ये (Jharkhand) पाण्यात एक विचित्र प्राणी सापडला आहे, ज्याला मगर (Crocodile) म्हणावं की मासा (Fish) असाच प्रश्न पडला आहे (Crocodile fish). धनबाद (Dhanbad) जिल्ह्यातील अमलाटांड गावात एका मच्छिमाराच्या जाळ्यात हा विचित्र जलचर सापडला (Jharkhand crocodile fish). मच्छिमाराने जेव्हा जाळ्यात पाहिलं तेव्हा त्यालाही धक्का बसला. कारण त्याचं तोंड हे मगरीसारखं (Fish head look like crocodile) आहे तर धड हे माशासारखं आहे (Crocodile head and fish body). जसा मगरीचा जबडा लांब असतो आणि तिच्या जबड्यात धारदार दात असतात तसेच या जीवाच्या तोंडातही आहे. पण त्याला मगरीसारखे पाय नाहीतर तर त्याचा डोक्याच्या खालील भाग हा माशासारखा आहे. माशासारखे कल्ले आणि शेपटीही त्याला आहे. हे वाचा - OMG! महिलेच्या कानात घुसला खेकडा आणि...; VIDEO पाहून तुम्हीही हादराल या जलचराची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली. अद्यापही लोक या जलचराला पाहण्यासाठी येत आहेत. ग्रामस्थांच्या मते, त्यांनी आपल्या आयुष्यात कधीच असा मासा पाहिला नाही. हा मासा फक्त गावातच नाही तर सोशल मीडियावरून आता सर्वत्र चर्चेत आहे. आता या माशाचं नाव त्यांनी क्रोकोडाइल फिश ठेवलं आहे. पण हा प्राणी नेमका कोण आहे, याची तुम्हाला काही माहिती आहे का? असेल तर नक्की आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे वाचा -  अरे बापरे! माणसासारखे दात; चक्क माणसांचे प्रायव्हेट पार्ट खातो हा मासा दरम्यान विचित्र मासा सापडण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी माणसासारखे दात आणि ओठ असलेल्या माशाचे फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. तसंच अगदी हुबेहूब माणसासारखा चेहरा असलेला शार्कनेही मच्छिमाराच्या जाळ्यात सापडला होता.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Crocodile, Fish, Jharkhand, Other animal

    पुढील बातम्या