Home /News /viral /

VIDEO: चिमुकल्याच्या स्टंटचा इंटरनेटवर धुमाकूळ; फ्लाईंग किकमुळे होतीये अक्षय कुमारशी तुलना

VIDEO: चिमुकल्याच्या स्टंटचा इंटरनेटवर धुमाकूळ; फ्लाईंग किकमुळे होतीये अक्षय कुमारशी तुलना

या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक लहान मुलगा बाटलीला जबरदस्त किक मारून त्याचं झाकण उघडतो.

    नवी दिल्ली 09 जुलै: सोशल मीडियावर (Social Media) अनेकदा लहान मुलांचे मजेशीर व्हिडिओ शेअर केले जातात. यातील काही व्हिडिओ इतके क्यूट (Cute Baby Video) असतात, की ते वारंवार पाहण्याची इच्छा होते. तर, काही व्हिडिओ पाहून नेटकरीही हैराण होतात. एक असाच व्हिडिओ सध्या समोर आला आहे. यामध्ये एक चिमुकला बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारप्रमाणंच जबरदस्त किक मारताना दिसतो. हा व्हिडिओ (Viral Video) सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकत आहे. एकच नंबर! कारनं घेतली होती जलसमाधी, मालकाला कंपनीकडून मिळालं मोठं गिफ्ट असं म्हटलं जातं, की लहान मुलं देवाचं रूप असतात. ते घर घर वाटत नाही जिथे लहान मुलाचा आवाज येत नाही. जगातील प्रत्येक आई-वडील स्वतःपेक्षाही आपल्या मुलांची जास्त काळजी घेतात. मात्र, अनेकदा लहान मुलांची मस्ती आपलं मन जिंकून घेते. काही मुलं तर अगदी लहान वयातच अशा काही गोष्टी करतात की ते पाहून सगळेच हैराण होतात. असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतं, की एक लहान मुलगा बाटलीला जबरदस्त किक मारून त्याचं झाकण उघडतो. VIDEO: लग्न दिराचं आणि चर्चा मात्र वहिनीची; पाहा मंडपात असं नेमकं काय घडलं? या मुलाची स्टाईल पाहून तुमहीही थक्क झाला असाल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ @MackBeckyComedy नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केला गेला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 32 हजारहून अधिकांनी पाहिला आहे. या क्यूट व्हिडिओवर कमेंट करत अनेकजण आपली प्रतिक्रिया देत आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Small baby, Stunt video, Video viral

    पुढील बातम्या