मुंबई, 11 जून : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लॉकडाऊनच्या काळात अनेक प्राण्यांचे आणि पक्षांचे व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांनी पाहाणं पसंत केलं आहे. 7 वर्षांच्या चिमुकलीचा आणि कोकिळेचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वेंगुर्ला इथे लॉकडाऊनमुळे शाळेला सुट्ट्या असल्यानं गावी गेलेल्या जिया लोहार या चिमुकलीनं सकाळी कोकिळेला साद घालण्यास सुरुवात केली. कोकिळेनं या जियालाही आपला मधूर सुरांनी त्यांचं उत्तर दिलं. या दोघींमधील या सुंदर संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता सुरुवातील जिया अगदी हळू आवाजात कोकिळेला साद घातल आहे. तिची हाक ऐकून कोकिळाही त्याला उत्तर देते आणि या दोघांमधील खिडकीतून रंगलेला हा अनोखा संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी पाहिला आहे. चिमुकली जसा स्पीड वाढवेल तसं कोकिळाही त्याला उत्तर देत आहे. त्यांच्यातील गमतीशीर हा खेळ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हे वाचा- तीर्थ समजून प्यायला सॅनिटाझर, सुनील ग्रोवरने शेअर केला VIDEO हे वाचा- अजब केमिस्ट्री! ऑनलाइन क्लास घेण्यासाठी केला जुगाड, VIDEO VIRAL संपादन- क्रांती कानेटकर