जाहिरात
मराठी बातम्या / Viral / एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी शार्कजवळ गेला आणि...; समुद्रातील थरारक VIDEO

एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी शार्कजवळ गेला आणि...; समुद्रातील थरारक VIDEO

एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी शार्कजवळ गेला आणि...; समुद्रातील थरारक VIDEO

एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी व्यक्तीने आपला जीव धोक्यात घातला.

  • -MIN READ
  • Last Updated :

माले, 01 जून : शार्क (Shark) म्हटलं तरी अंगावर काटा येतो. शार्कशी संबंधित फिल्म पाहतानासुद्धा दरदरून घाम फुटतो. पाण्यातून प्रवास करताना असे शार्क आपल्या बोटीजवळ पाण्यात जरी दिसली तरी अंगाचा थरकाप उडतो. मग मुद्दामहून या शार्कच्या जवळ कोण बरं जाईल. पण एका व्यक्तीने ते केलं. चुकीने किंवा पाण्यात पडला म्हणून नाही तर तो मुद्दामहून शार्कच्या जवळ गेला. एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला (Man risk his life in shark-infested waters to save bird) हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. समुद्राच्या पाण्यात पडलेल्या एका छोट्याशा पक्ष्याला वाचवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्या जीवाचा किंचितसाही विचार केला नाही. समुद्रात शार्क असताना त्याला डोळ्यांनी दिसत होतं तरी त्याने आपला जीव धोक्यात घालून शार्क असलेल्या या समुद्राच्या पाण्यात उडी मारली आणि एका पक्ष्याला वाचवण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली.

जाहिरात

न्यूयॉर्क पोस्टने हा व्हिडीओ आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडीओत पाहू शकता, एक व्यक्ती समुद्राच्या पाण्यात पोहोताना दिसते आहे. त्या व्यक्तीच्या हातात काही तरी आहे. आपला एक हात या व्यक्तीने वरच ठेवला आहे. तर एका हाताने पोहोत ही व्यक्ती एका बोटीच्या दिशेने येत असते. तितक्यात त्या व्यक्तीजवळ काही शार्कही पोहोताना दिसताच. शार्क त्या व्यक्तीच्या दिशेनेच जात असतात. पण या व्यक्तीचं लक्ष पूर्णपणे आपल्या एका हाताजवळ असतं. हे वाचा -  मुलाला पाहताच वाघानं केला हल्ला, VIDEO मध्ये पाहा चिमुरड्याने कसा वाचवला जीव! कसंबसं करत ही व्यक्ती बोटीजवळ पोहोचते आणि शार्कने आपल्याला काही करू नये, यासाठी स्वतः बोटीत चढण्याऐवजी आधी आपल्या हातात असलेल्या पक्ष्याला बोटीतील व्यक्तीकडे सुपूर्द करते. त्यानंतर ही व्यक्ती बोटीत चढते. सुदैवाने समुद्रातील शार्क या व्यक्तीला काहीही करत नाही. न्यूयॉर्क पोस्ट नुसार हा पक्षी जेबरा फिंच आहे, जो खूप महाग असतो. हा पक्षी या लोकांसोबतच लक्झरी बोटीत राहत होता. ज्या व्यक्तीने त्याचा जीव वाचवला आहे, त्याचं नाव मोहम्मद रकीब असं आहे. हा व्हिडीओ मालदीवमधील आहे. हे वाचा -  VIDEO: जंगलाचा राजा सिंहाला झेब्राची शिकार करणं पडलं भारी; पुढे असं काही झालं… एका पक्ष्याला वाचवण्यासाठी या मोहम्मदची धडपड पाहता त्याचं सोशल मीडियावर कौतुक होतं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात