नवी दिल्ली, 2 जून : कोणतंही युद्ध जिंकण्यासाठी ताकदीपेक्षा धैर्य, बुद्धी, साहस अधिक गरजेचं ठरतं. धैर्य मोठं असेल, तर मोठ्यातला मोठा योद्धाही हार मानतो किंवा हारतोच. अशाच साहसाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक सिंहाने (Lion) एका जिराफावर केलेला हल्ला, त्याच्यावरच उलटला असल्याचं व्हिडीओमध्ये दिसतंय. जिराफाने आपल्या साहसाच्या जोरावर थेट जंगलाचा राजा सिंहालाच मात दिली आहे. भल्यामोठ्या जिराफावर सिंहाने हल्ला केला, पण त्याला असा हल्ला करणं चांगलंच महागात पडलं. एका जंगलात जिराफाला पाहून सिंह त्याच्यावर उंच उडी मारुन हल्ला करतो. पण जिराफ सिंहालाच आपल्या पायांनी उडवतो आणि त्याला खाली पाडून पुढे पळून जातो. या हल्लात सिंह मात्र काहीच करू शकत नाही. हा व्हिडीओ भारतीय वन सेवा अधिकारी प्रवीण अंगूसामी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करत, वीरता आणि मूर्खता एकच गोष्ट आहे असं म्हटलं आहे. दोघांचा रिझल्टच याचं लेबल निश्चित करतं, की त्याला यशस्वी म्हणावं की मूर्ख, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
(वाचा - जंगलात पर्यटकांना पाहून जिराफाने धारण केलं भयंकर रुप, पुढे काय झालं…पाहा VIDEO )
सिंह जिराफावर पुढे येऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जिराफ न घाबरता, धैर्याने सिंहाला मात देऊन पुढे जातो. जिराफ इतक्या जोरात त्याचे पाय सिंहाला मारतो, की सिंह पूर्ण जमिनीवर पडतो. त्याआधी सिंह जिराफाची मान पकडण्याचा प्रयत्नही करतो.
Bravery & Stupidity are one & the same thing. The outcome determines the label, so better be successful or be prepared to be called stupid. pic.twitter.com/1mkucroJLl
— Praveen Angusamy IFS 🐾 (@JungleWalaIFS) May 18, 2021
पण जिराफ मात्र आपल्या पायांनी सिंहाला खाली पाडतो आणि सिंह आपल्या बचावासाठी काही करू शकत नाही.